शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पोलंडच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांसह शिष्टमंडळ आज कोल्हापुरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 06:45 IST

दरम्यान, खासदार संभाजीराजे यांनी या पोलंडवासीयांची कोल्हापूरशी असणारी ओढ पाहून त्यांच्याशी बंध आणखी दृढ करावेत यासाठी प्रयत्न सुरू केले

कोल्हापूर : पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री मार्सिन प्रीझीदॅज यांच्या नेतृत्वाखालील २९ जणांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ शुक्रवारी १३ रोजी कोल्हापुरात येत आहे. त्यांच्या हस्ते वळिवडे येथील पोलंड निर्वासितांच्या स्मृतिस्तंभाचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्ताने कोल्हापूर आणि पोलंडवासीयांच्या भावुक नात्यांचे बंध अधिक दृढ होणार आहेत. विशेष म्हणजे २९ जणांच्या शिष्टमंडळात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या वसाहतीत बालपण घालविलेल्या ११ जणांचा समावेश आहे. यानिमित्ताने हे वृद्ध पोलंडवासीय आपल्या जन्मभूमीत पुन्हा एकदा पाऊल ठेवणार आहेत.

दुसºया महायुद्धकाळात १९४२ ते १९४८ या काळात पोलंडचे पाच हजार नागरिक निर्वासित म्हणून कोल्हापुरात आले. त्यांना तत्कालीन छत्रपती घराण्याने आसरा देत वळिवडे येथे वसाहत उभारून दिली. या ऋणातून मुक्त होण्यासाठी यांतील काही पोलंडवासीय न चुकता कोल्हापुरात येत होते.

दरम्यान, खासदार संभाजीराजे यांनी या पोलंडवासीयांची कोल्हापूरशी असणारी ओढ पाहून त्यांच्याशी बंध आणखी दृढ करावेत यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्याच प्रयत्नांतून पोलंडवासीयांच्या स्मृती जपण्याचा उपक्रम हाती घेतला. वळिवडे येथे स्मृतिस्तंभासहत्या वसाहतीतील छायाचित्रांसह कायमस्वरूपी संग्रहालय उभारण्यास सुरुवात झाली.

आज स्मृतिस्तंभ तयार झाला आहे. त्याचे उद्घाटनही या पोलंडवासीयांच्याच हस्ते करण्याचा निर्णय घेऊन तसे निमंत्रण त्यांना दिले गेले. त्यांनी निमंत्रणाचा स्वीकार केला. त्याप्रमाणे हे शिष्टमंडळ कोल्हापुरात येत आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार बैठकीत सांगितले. उपपरराष्ट्रमंत्री मार्सिन प्रीझीदॅज यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ शुक्रवारी रात्री कोल्हापुरात येणार आहे. शनिवारी (दि. १४) सकाळी आठ वाजता हॉटेल सयाजी येथे उद्योजकांशी ते संवाद साधणार आहेत.

फौंड्री, अ‍ॅन्सिलरी मशीन कॉम्पोनंट्स, आॅटो पार्टस, हाय प्रिसिशन टूल्स, साखर, गूळ, यार्न स्पिनिंग मिल आणि टेक्स्टाईल, रासायनिक आणि डेअरी उद्योगातील प्रतिनिधींना यावेळी बोलावण्यात आले आहे. पत्रकार बैठक होणार आहे. यानंतर सकाळी १०.३० वाजता प्रीझीदॅज यांच्या हस्ते वळिवडे येथील स्मृतिस्तंभाचे अनावरण होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर