शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: प्रशांत कोरटकरवर अब्रुनुकसानीचा दावा, कारागृहाच्या पत्यावरच पाठवली नोटीस; जामीन मिळणार?

By उद्धव गोडसे | Updated: April 7, 2025 15:40 IST

कोल्हापूर : महापुरुषांचा अवमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणे या प्रकरणात सद्या न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपी प्रशांत ...

कोल्हापूर: महापुरुषांचा अवमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणे या प्रकरणात सद्या न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपी प्रशांत कोरटकरवर अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला आहे. इंद्रजित सावंत यांनी कारागृहाच्या पत्यावरच कोरटकरला ॲड.असीम सरोदे यांच्यातर्फे कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आज न्यायालयात कोरटकरच्या जामीनावर सुनावणी होत असतानाच अब्रुनुकसानीची नोटीस पाठवल्याने जामीन मिळणार की कोठडीतील मुक्काम वाढणार हे पाहावे लागणार आहे.न्यायालयात प्रशांत कोरटकरने दाखल केलेल्या जामीन अर्जात त्याने इतिहास संशोधक इंद्रजित यांनी अनेकदा स्वतःच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला आणि सावंत यांच्यावरच सामाजिक तेढ निर्माण करण्याबाबतचे गुन्हे नोंद आहेत व त्यांना अटक झाली होती इत्यादी खोटी माहिती लिहिली होती. त्यातून इंद्रजीत सावंत यांची बदनामी करण्यात येत असल्याचा आक्षेप त्यांनी न्यायालयात केल्यावर प्रशांत कोरटकर तर्फे ते परिच्छेद रद्द करीत असल्याचे न्यायालयासमोर लेखी स्वरूपात सांगण्यात आले होते. ॲड. योगेश सावंत यांनी स्वतः कोल्हापूर कारागृहात जाऊन इंद्रजित सावंत यांच्यातर्फे आरोपी प्रशांत कोरटकर याला अब्रुनुकसानीची नोटीस जेलर अविनाश भोई यांच्या हस्ते देण्यात आली.

याआधी कोर्टाने प्रशांत कोरटकर याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. यानंतर १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान कोरटकरने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला होता. आज, सोमवार कोरटकरला व्हिसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस