दीपक दळवी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:18 IST2021-06-28T04:18:19+5:302021-06-28T04:18:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील लोकराजा फोरमचे अध्यक्ष दीपक अप्पासाहेब दळवी (वय ४२) यांचे निधन झाले. दीड ...

Deepak Dalvi passes away | दीपक दळवी यांचे निधन

दीपक दळवी यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : येथील लोकराजा फोरमचे अध्यक्ष दीपक अप्पासाहेब दळवी (वय ४२) यांचे निधन झाले. दीड महिन्यापासून त्यांच्यावर कोरोना आणि पोस्ट कोविडचे उपचार सुरू होते. शाहू विचार सर्वदूर पोहचवण्यासाठी झटणाऱ्या या कार्यकर्त्याने शाहू जयंतीदिनीच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगी, विवाहित बहीण असा परिवार आहे.

दीपक आणि त्यांची आई पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचार सुरू झाले. आठ दिवसांनी आईचे निधन झाले. काही दिवसांतच कोरोनावर मात करून ते घरी परतले. परंतु पोस्ट कोविडमुळे विविध तक्रारी उद्भवल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दीपक यांच्यासह त्यांच्या मित्रांनी लोकराजा फोरमच्या माध्यमातून ‘राजर्षी’ या चित्रमय पुस्तकाची निर्मिती केली होती. या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले होते.

Web Title: Deepak Dalvi passes away