श्री देवी इंदुमती बोर्डिंगच्या इमारतीचे आज लाेकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:18 IST2021-06-26T04:18:25+5:302021-06-26T04:18:25+5:30

सरोज गुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्याकडून श्री देवी इंदुमती बोर्डिंगला बांधून देण्यात आलेल्या दोन मजली इमारतीचा लोकार्पण सोहळा आजए शनिवारी ...

Dedication of Shri Devi Indumati Boarding Building today | श्री देवी इंदुमती बोर्डिंगच्या इमारतीचे आज लाेकार्पण

श्री देवी इंदुमती बोर्डिंगच्या इमारतीचे आज लाेकार्पण

सरोज गुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्याकडून श्री देवी इंदुमती बोर्डिंगला बांधून देण्यात आलेल्या दोन मजली इमारतीचा लोकार्पण सोहळा आजए शनिवारी होणार आहे. शाहू छत्रपती व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते या इमारतीचे लाेकार्पण होणार असून सरोजिनी पाटील, आमदार चंद्रकांत जाधव व आमदार ऋतुराज पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन दुर्वास कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दुर्वास कदम म्हणाले, सरोज इंडस्ट्रीजचे संस्थापक स्व. परशुराम जाधव यांनी इंदूमती बोर्डिंगला नवीन इमारत बांधून देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार दीपक जाधव व भरत जाधव यांनी त्यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली असून या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. यावेळी व्हा. चेअरमन किशोर कटके, संचालक माजी उपमहापौर भूपाल शेटे, अरुण कुराडे, गणेश नारायणकर उपस्थित होते.

Web Title: Dedication of Shri Devi Indumati Boarding Building today