इंगवले कोविड सेंटरचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:18 IST2021-06-05T04:18:50+5:302021-06-05T04:18:50+5:30

कोल्हापूर : शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले व माजी नगरसेविका तेजस्विनी इंगवले यांनी कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी गांधी मैदान पॅव्हेलियनमध्ये ...

Dedication of Ingwale Kovid Center | इंगवले कोविड सेंटरचे लोकार्पण

इंगवले कोविड सेंटरचे लोकार्पण

कोल्हापूर : शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले व माजी नगरसेविका तेजस्विनी इंगवले यांनी कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी गांधी मैदान पॅव्हेलियनमध्ये शुक्रवारपासून दिवंगत प्रा. विष्णूपंत इंगवले यांच्या नावांने कोविड सेंटर सुरू केले. किमान दीड महिने पुरतील एवढे औषधे, फळे, अंडी, दोन वेळचे जेवण व नाष्टा हे सर्व रुग्णांना मोफत पुरवण्यात येणार आहे.

या केंद्राचे लोकार्पण राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, डॉ. श्रीराम जोशी, डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. हळदवणेकर, जितू पाटील, जयेश कदम, ॲड. राजेंद्र किंकर, ॲड. रमेश पोवार, निवासराव साळोखे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या केंद्रात चार डॉक्टर, प्रत्येकी चार परिचारिका, ब्रदर, हेल्पर असे कर्मचारी दिवसरात्र उपलब्ध राहणार आहेत. हे कोविड सेंटर सुरू करून इंगवले यांनी शब्द पाळल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.

०४०६२०२१-कोल-इंगवले कोविड सेंटर

कोल्हापुरात शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी गांधी मैदान पॅव्हेलियनमध्ये सुरू केलेल्या कोविड सेंटरचे लोकार्पण शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

Web Title: Dedication of Ingwale Kovid Center