गडहिंग्लज विभागात पावसाचा जोर कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST2021-06-19T04:17:54+5:302021-06-19T04:17:54+5:30
जरळी बंधारा वगळता गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर, इंचनाळ, निलजी, नांगनूर हे बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. शुक्रवारी (१८) सकाळी ८ पर्यंत ...

गडहिंग्लज विभागात पावसाचा जोर कमी
जरळी बंधारा वगळता गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर, इंचनाळ, निलजी, नांगनूर हे बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. शुक्रवारी (१८) सकाळी ८ पर्यंत गडहिंग्लज तालुक्यातील सरासरी ३८.७१ मि. मी. तर आजअखेर ३१३.२९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
दोन दिवसांच्या जोरदार पावसामुळे घराची भिंती कोसळून तावरेवाडीत सुगंधा भावकू पाटील ४००००, सांबरेत तुळशीराम दत्तू कांबळे १००००, बुगडीकट्टीत रायाप्पा बिरसिद्धा धनगर यांच्या गोठ्याची भिंत पडून १००००, जरळीत तिप्पाण्णा धनगर यांचे ५००००, हसूरसासगिरीत आनंदा बाबू देसाई यांचे १० हजाराचे नुकसान झाले आहे. कडलगेत राजगोंडा भरमगोंडा शिरहट्टी यांचे २००००, भडगावमध्ये मंजुनाथ दुंडाप्पा कुरणे यांच्या पोल्ट्री शेडचे १० हजाराचे, मुगळीत बाळू कुराडे तर मासेवाडीत नाना टक्केकर यांच्या घराची भिंत कोसळून प्रत्येकी ३५ हजार तर चिंचेवाडीत संगीता कणुकले यांचे ४० हजाराचे नुकसान झाले आहे.