शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गूळ उत्पादनात सव्वाचार लाख रव्यांची घट

By admin | Updated: March 24, 2015 00:18 IST

क्विंटलला तीन हजार दर : गूळ उत्पादक शेतकऱ्यांची गुऱ्हाळघराकडे पाठ; बाजार समितीच्या उत्पन्नालाही फटका

प्रकाश पाटील - कोपार्डे-- गुळाचा प्रारंभीचा सौदा विक्रमी दराने काढल्यानंतर झालेली गुळातील सततची घसरण, अवकाळी पाऊस, अडत वसुलीचा दोलायमान निर्णय, यामुळे या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गूळ उत्पादन करण्यापेक्षा साखर कारखान्यांकडे ऊस पाठविण्यास प्राधान्य दिले. याचा परिणाम या हंगामात गूळ उत्पादनात सव्वाचार लाख गूळ रव्यांची आवक कमी झाल्याचे बाजार समितीतील आकडेवारीवरून स्पष्ट झाले. बाजार समितीच्या उत्पन्नालाही यामुळे मोठा फटका बसला आहे.प्रारंभीचा सौदा शासकीय संचालक मंडळाने मोठ्या थाटात ६६६६ रुपये प्रतिक्विंटल काढला. मात्र, यानंतर गूळ दरातील झालेली मोठी घसरण व सतत होणारा गूळ दरातील चढ-उतार यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस गूळ उत्पादनाऐवजी साखर कारखान्यांकडे पाठविण्यावर भर दिला. त्यातच साखर कारखान्यांनी या हंगामात ‘एफआरपी’ प्रमाणे दिलेला चांगला दर याचेही गूळ उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविण्याचे मोठे कारण सांगण्यात येत आहे.एवढेच नाही, तर या हंगामात सुरुवातीपासून अवकाळी पावसाने गुऱ्हाळघरांना वारंवार अडथळा आणल्याने गुऱ्हाळघर मालकांना आठ दिवस गुऱ्हाळघरे बंद ठेवावी लागली. गूळ उत्पादक शेतकरी डिसेंबर-जानेवारीमध्ये गुळाचे दर २२०० ते २६०० प्रतिक्विंटलवर आल्यानंतर प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. तब्बल आठ दिवस गुळाच्या एका रव्याचीही आवक तर झाली नाहीच, शिवाय गुऱ्हाळघरे बंद ठेवून उत्पादन खर्चाएवढातरी दर मिळावा, यासाठी एल्गार पुकारला. यानंतर बाजार समिती, व्यापारी व शेतकऱ्यांची बैठक होऊन गूळ दरात सुधारणा झाली. यानंतर शेतकऱ्यांच्या ऐवजी व्यापाऱ्यांकडून अडत वसूल करण्याचे आदेश पणन संचालक सुभाष माने यांनी काढल्यानंतर व्यापाऱ्यांनी त्याविरोधात बंड पुकारले. यातून सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यापाऱ्यांकडून अडत वसुलीच्या निर्णयावर स्थगिती दिली, अशी या हंगामात संकटांची आणि अडथळ्यांची मालिकाच गूळ व्यवसायावर निर्माण झाल्याने ‘गोड गुळाला कडू व्यवहारा’ची झालर लागली. याचा परिणाम म्हणजे, या हंगामात आॅक्टोबर २०१४ ते २१ मार्च २०१५ या दरम्यान मागील हंगामापेक्षा तब्बल सव्वाचार लाख गूळ रव्यांची आवक बाजार समितीत कमी झाली आहे.या हंगामात उत्पादन खर्चाएवढाही गुळाला दर मिळाला नाही. सतत दरातील चढ-उतार, शासनाचे गूळ दर व अडत वसुलीचे कचखाऊ धोरण, यामुळे गूळ उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला. जिल्ह्यातील १२०० गुऱ्हाळघरांपैकी संपूर्ण हंगाम पूर्ण करणारे केवळ ३००च गुऱ्हाळघरे आहेत. यावर्षीची गूळ रव्यांची घट पाहता पुढील वर्षीही दर मिळाला नाही, तर गूळ उद्योगच अडचणीत सापडणार आहे. »f                                                             - शिवाजी पाटील, --अध्यक्ष, गूळ उत्पादक संघटना.गुळाचा दर व सतत होणारे सौद्यातील अडथळे, यामुळे नाशवंत गुळाला प्राधान्य देण्यापेक्षा यावर्षी आपण सर्व ऊस साखर कारखान्याला पाठविण्याचा निर्णय घेतला.                                                                                     - शिवाजी पाटील, गूळ उत्पादक, शिंदेवाडी, ता. करवीर.