शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दूध पावडरच्या दरातील घसरण थांबेना, गाय दूध उत्पादक अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 17:58 IST

आगामी काळात पुन्हा दुधाचे उत्पादन वाढणार असल्याने अतिरिक्त दुधाचे करायचे काय? असा दूध संघांपुढे पेच

राजाराम लोंढेकोल्हापूर : गायीच्या दुधाला चांगले भाव मिळू लागल्याने शेतकरी दूध व्यवसायाकडे वळला आणि उत्पादन वाढले. आता उत्पादन वाढल्याने दर कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यात दूध पावडरच्या दरातील घसरण थांबत नसून महिनाभरात किलोमागे पुन्हा १५ रुपयांची घसरण झाली आहे. आगामी काळात पुन्हा दुधाचे उत्पादन वाढणार असल्याने अतिरिक्त दुधाचे करायचे काय? असा पेच दूध संघांपुढे आहे.आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत दूध व दूध पावडरची मागणी वाढल्याने जानेवारीपासून दूध संघांनी उत्पादन वाढीसाठी कंबर कसली. दुधाबरोबरच दूध पावडर व बटरच्या दरात वाढ होत गेल्याने दुधाची कमी पडू लागली. दूध पावडर प्रतिकिलो ३३५, तर बटर ४४० रुपयांपर्यंत पोहोचले होते. दूध संघांनी शेतकऱ्यांना गायी, म्हशी खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले. शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून गायी खरेदी केल्या. गायीच्या दुधाला किमान ३७ रुपये दर मिळत होता, त्यामुळे पशुखाद्य कंपन्यांनी खाद्याच्या दरातही वाढ केली.साधारणता ऑक्टोबरनंतर दूध वाढत जाते, त्यानंतर दूध दर कमी होतात. मात्र, यंदा जुलै महिन्यातच दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे.

असे आहेत पशुखाद्याचे दर (५० किलो) :महालक्ष्मी गोल्ड : १२६० रुपयेइतर कंपन्यांचे : १२६० रुपयेसमृद्धी : १६७५भुस्सा : ११६० रुपये

‘पणन’ने कच्चा माल खरेदी करावापशुखाद्याच्या दरवाढीमागे व्यापारीच कारणीभूत आहेत. खाद्यासाठी लागणारा कच्चा माल व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दराने घेऊन तोच माल पशुखाद्य कंपन्यांना चढ्या भावाने विक्री करतात. यासाठी शासनाने ‘पणन’ विभागाच्या माध्यमातून कच्चा माल खरेदी करून दूध खाद्य उत्पादक कारखान्यांना दिला तर दरावर नियंत्रण राहू शकते.गाय पावडर व बटरच्या दरात अशी झाली घसरण -उत्पादन-दोन महिन्यांपूर्वीचा दर - सध्याचा दरपावडर   -  ३३५    -   २३५बटर       -  ४४०    -   ३६०

दूध कमी पडू लागले म्हणून संघांनी गायी खरेदी करण्यास सांगितले. आता दर कमी केले, मग आता गायी विकायच्या का? दर कमी केल्याने उत्पादन व खर्चाचा मेळ बसत नाही. - संदीप पाटील ( दूध उत्पादक शेतकरी)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmilkदूध