जलयुक्त चौकशीचा निर्णय केवळ राजकीय सूडबुध्दीने, कोणाचाही बाप काढलेला नाही : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 03:16 PM2020-10-15T15:16:38+5:302020-10-15T15:22:26+5:30

chandrkant patil, bjp, kolhapur, राज्यात जलयुक्त शिवारमधून ६ लाख ४१ हजार ५६० कामे झाली. त्यातील केवळ ११२८ म्हणजे ०.१७ टक्के कामे तपासून कॅगने ही योजना अव्यवहार्य असल्याचा निष्कर्ष काढला आहे. यासाठी केवळ शासनाचा पैसा खर्च झाला नाही. प्रचंड लोकसहभाग यामध्ये होता. अनेक गावच्या पाणीपातळीत वाढ झाली. अनेक जिल्ह्यातील टँकर कमी झाले. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामांच्या चौकशीचा निर्णय केवळ आणि केवळ राजकीय सूडबुध्दीने घेतला असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Decision of water-based inquiry only with political revenge: Chandrakant Patil | जलयुक्त चौकशीचा निर्णय केवळ राजकीय सूडबुध्दीने, कोणाचाही बाप काढलेला नाही : चंद्रकांत पाटील

जलयुक्त चौकशीचा निर्णय केवळ राजकीय सूडबुध्दीने, कोणाचाही बाप काढलेला नाही : चंद्रकांत पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देजलयुक्त चौकशीचा निर्णय केवळ राजकीय सूडबुध्दीने  : चंद्रकांत पाटील कोणाचाही बाप मी काढलेला नाही. ती आमची संस्कृती नाही : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : राज्यात जलयुक्त शिवारमधून ६ लाख ४१ हजार ५६० कामे झाली. त्यातील केवळ ११२८ म्हणजे ०.१७ टक्के कामे तपासून कॅगने ही योजना अव्यवहार्य असल्याचा निष्कर्ष काढला आहे. यासाठी केवळ शासनाचा पैसा खर्च झाला नाही. प्रचंड लोकसहभाग यामध्ये होता. अनेक गावच्या पाणीपातळीत वाढ झाली. अनेक जिल्ह्यातील टँकर कमी झाले. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामांच्या चौकशीचा निर्णय केवळ आणि केवळ राजकीय सूडबुध्दीने घेतला असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

विविध प्रश्नांवर भूमिका मांडण्यासाठी पाटील यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, सरकार तीन पक्षांचे आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यांनी चौकशी करून जिथे चुकीचे काम झाले आहे. त्यांच्यावर कारवाई करावी. मेट्रोच्या कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय अतिशय अव्यवहार्य असून साडे चार वर्षे हा प्रकल्प रखडणार असून त्याचा मोठा आर्थिक फटका हा प्रवाशांना बसणार आहे.

मराठी भाषेतील शब्द अनेकांना कळत नाहीत. कोणाचाही बाप मी काढलेला नाही. ती आमची संस्कृती नाही. आम्हीही तुमचे बाप आहोत याचा मराठीत होणारा अर्थ कळत नसेल तर मी काय करणार आणि नरेंद्र मोदी यांचे म्हणाल तर १३० कोटी जनता आहे त्यांना बाप म्हणायला. विद्यार्थ्यांची सध्या मानसिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शासनाने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१२१ असे शैक्षणिक वर्ष जाहीर करून ही कोंडी फोडावी.

एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाही. सध्याच त्यांच्याशी माझे दोन वेळा बोलणे झाले. आहे. खडसे असो किंवा देवेंद्र फडणवीस हे दोघेही मोठ्या मनाचे नेते आहेत. त्यामुळे आम्ही जेव्हा एकत्र बसू तेव्हा यातून नक्की मार्ग निघेल असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे उपस्थित होते.

Web Title: Decision of water-based inquiry only with political revenge: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.