शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांच्या आयकर परताव्याबाबत दोन महिन्यात निर्णय, केंद्रीय सहकार मंत्र्यांचे राज्य सरकारला आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 11:32 IST

कारखान्यांनी शेतकऱ्यांना एसएमपी किंवा एफआरपीपेक्षा जादा दर दिल्याने केंद्र सरकारने त्यांच्याकडून संबंधित रकमेवर आयकर वसूल केला आहे

कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या आयकर परताव्याबाबत दोन महिन्यात निर्णय घेऊ, अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिली. विविध नैसर्गिक अडचणींमुळे राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीत असून त्यांना सावरण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना भागभांडवल द्यावे, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.राज्यातील साखर उद्योगाच्या विविध प्रश्नांबाबत मंगळवारी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. हंगाम संपल्यापासून नवीन सुरू होईपर्यंत लागणाऱ्या खर्चासह बँकांकडून उचल मिळेपर्यंत कारखान्यांकडे पैसे नसतात. बँकांकडून ११ ते १२ टक्के व्याजाने कर्जे काढून हा खर्च करावा लागतो. त्याऐवजी केंद्र सरकारने अल्पव्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले तर व्याजापोटी होणारा खर्च कमी होण्यास मदत होणार असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. कारखान्यांनी शेतकऱ्यांना एसएमपी किंवा एफआरपीपेक्षा जादा दर दिल्याने केंद्र सरकारने त्यांच्याकडून संबंधित रकमेवर आयकर वसूल केला आहे. ही रक्कम सुमारे साडेनऊ हजार कोटी आहे. हे पैसे कारखान्यांना परत करावी, अशी मागणी केली. यावर, याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून येत्या दोन महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री शहा यांनी दिले. इथेनॉल निर्मितीकडे कारखाने वळत आहेत, मात्र त्यांचा ताळेबंद पाहून राष्ट्रीयीकृत बँका कर्जपुरवठा करत नाहीत, यासाठी सरकारने वेगळे अर्थसहाय द्यावे. त्याचबरोबर कर्जाची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार धनंजय महाडीक, खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे आदी उपस्थित होते.

राज्यातील साखर उद्योगासमोरील अडचणींबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याने लवकरच हे प्रश्न मार्गी लागतील. -धनंजय महाडीक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने