शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दौलत कारखान्याच्या ताब्याचा सोमवारी फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 18:49 IST

थकबाकीपोटी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे तारण असलेल्या चंदगडच्या दौलत सहकारी साखर कारखान्याचा ताबा बँकेकडे राहणार की पुन्हा न्यूट्रीयन्स कंपनीकडे जाणार याबाबतचा फैसला सोमवारी (दि. ४ फेब्रुवारी) होणार आहे. भाडे करार मोडून कारखान्याचा ताबा घेतलेल्या बँकेच्या विरोधात न्यूट्रीयन्स कंपनीने जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे, त्याची सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली.

ठळक मुद्देदौलत कारखान्याच्या ताब्याचा सोमवारी फैसलाजिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण : वँकेचा युक्तीवादही केला मान्य

कोल्हापूर : थकबाकीपोटी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे तारण असलेल्या चंदगडच्या दौलत सहकारी साखर कारखान्याचा ताबा बँकेकडे राहणार की पुन्हा न्यूट्रीयन्स कंपनीकडे जाणार याबाबतचा फैसला सोमवारी (दि. ४ फेब्रुवारी) होणार आहे. भाडे करार मोडून कारखान्याचा ताबा घेतलेल्या बँकेच्या विरोधात न्यूट्रीयन्स कंपनीने जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे, त्याची सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली.चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखाना थकबाकीपोटी जिल्हा बँकेकडे तारण आहे. बँकेचा परवाना धोक्यात आल्याने दोन वर्षांपूर्वी ४२ वर्षांच्या भाडे करारावर हा कारखाना बँकेने न्यूट्रीयन्स अ‍ॅग्रो फ्रुटस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला चालविण्यास दिला. करारात ठरल्याप्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी ३३ कोटी ५७ लाख ८४ हजार रुपये कंपनीने बँकेकडे जमा केले; पण उर्वरित हफ्ते जमा करण्याबाबत चालढकल केली. शेतकरी, कामगारांचीही देणी थकली.

या तक्रारींची दखल घेत बँकेने पैसे भरण्याविषयी वारंवार नोटीस दिली; पण कंपनीकडून असमर्थतता दर्शविली गेल्याने अखेर संचालक मंडळाने न्यूट्रीयन्सबरोबरचा करार मोडत असल्याचे जाहीर केले. तसे कंपनीला कळवून डिसेंबरमध्ये कारखान्याचा रितसर ताबा घेत गेटला कुलूपही लावले. ताब्यात आल्यानंतर पुन्हा भाडे कराराने देण्यासंदर्भात बँकेकडून निविदाही प्रसिद्ध करण्यात आली.

दरम्यान, ही सर्व प्रक्रिया सुरू असताना कारखान्याचा ताबा बँकेने बेकायदेशीरपणे घेतला असल्याचे सांगत जिल्हा न्यायालयात बँकेच्या विरोधात याचिका दाखल केली. या याचिकेवर गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली.

 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर