शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मण उद्योजक संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार, कोल्हापूर येथील नियोजन बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 17:44 IST

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने २५ ते २९ आॅक्टोबर २0१८ रोजी पुणे येथे अ‍ॅग्रीकल्चर कॉलेजवर ‘ब्राह्मण उद्योजक संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये कोल्हापूरमधून उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास उद्योजक नितीन वाडीकर आणि नानासाहेब चितळे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देब्राह्मण उद्योजक संमेलन यशस्वी करण्याचा निर्धारकोल्हापूर येथील नियोजन बैठकीत निर्णय

कोल्हापूर : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने २५ ते २९ आॅक्टोबर २0१८ रोजी पुणे येथे अ‍ॅग्रीकल्चर कॉलेजवर ‘ब्राह्मण उद्योजक संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये कोल्हापूरमधून उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास उद्योजक नितीन वाडीकर आणि नानासाहेब चितळे यांनी व्यक्त केला.या संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी कोल्हापूर येथे उद्योजक आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांना इंडियन व्हर्च्यूअल युनिव्हर्सिटी बंगलोर यांनी संघटन आणि सामाजिक कार्याबद्दल डॉक्टरेट मिळाल्याने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र प्रदेश उद्योग आघाडीचे सरचिटणीस सागर कुलकर्णी यांनी पुण्यात पाच दिवस होणाऱ्या या संंमेलनाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी चितळे उद्योग समूहाचे नानासाहेब चितळे यांनी मार्गदर्शन करून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस नितीन वाडीकर, मार्गदर्शक अभय देशपांडे, दिलीप गुणे, घाटगे- पाटील उद्योग समूहाचे मोहन घाटगे, अनिता जनवाडकर, सुप्रिया काळे, केदार तेंडुलकर, अभय तेंडुलकर, गणेश अभ्यंकर, सुरेश गुळवणी, डॉ. उदय कुलकर्णी, सतीश कुलकर्णी यांनी चर्चेत भाग घेतला. शेवटी गोविंद कुलकर्णी यांनी सर्व उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन केले.राष्ट्रीय महासचिव शामराव जोशी यांनी प्रास्ताविक केले. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्र्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले. आदित्य मैंदरगीकर यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी श्रीपाद मराठे, अ‍ॅड. चंद्रशेखर कुलकर्णी, केदार पारगावकर, श्रीधर कुलकर्णी, उदय महेकर, सुधीर सरदेसाई, दिलीप कुलकर्णी, अ‍ॅड. सुघोष खांडेकर, अ‍ॅड. आसावरी कुलकर्णी, अ‍ॅड. जमदग्नी कुरुंदवाड, मयुर तांबे, हरिष कुलकर्णी जयसिंगपूर, किरण कुलकर्णी, प्रियांका कुलकर्णी, सुनील सामंत, निखिल इनामदार, प्रदीप अष्टेकर, सतीश सांगरूळकर, स्वानंद कुलकर्णी, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :brahman mahasanghब्राह्मण महासंघkolhapurकोल्हापूर