Integration of Dombivli Brahmin knowledge | डोंबिवलीत ब्राह्मण ज्ञातींचे एकत्रिकरण

ठळक मुद्देअन्याय खपवून घेतला जाणार नाही :ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षपदी प्रज्ञेश प्रभूघाटे यांची निवड

डोंबिवली: जातीपातीचे राजकारण योग्य नाहीच, त्यातही द्वेषाने वागणून देणे अथवा अपमानास्पद बोलणे कधीही उचित नाही. त्यामुळे यापुढे अन्याय खपवून घेतला जाणार नाही. अन्याय कोणावरही करायचा नाही आणि करवूनही घ्यायचा नाही. डोंबिवलीत संपन्न झालेल्या ब्राह्मण महासंघाच्या बैठकीत एकमताने हे ठरवण्यात आले. ब्राह्मणांनीही एकत्र येण्याची नितांत गरज असून त्यासाठी डोंबिवलीसह परिसरातील ब्राह्मणांनी एकत्र यावे, संघटीत व्हावे असे आवाहन ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आले.
येथिल ब्राह्मण सभेमध्ये मंगळवारी रात्री घेण्यात आलेल्या सभेमध्ये संघटनात्मक कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रज्ञेश प्रभुघाटे यांची महासंघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. तर संदीप पुराणिक हे महासंघाचे कार्यवाह म्हणुन काम बघतील मानस पिंगळे, प्रदीप जोशी हे उपाध्यक्ष, निलेश विरकर सहकार्यवाह, विवेक परांजपे कोषपाल, मनिषा धोपटकर सहकोषपाल, तर डॉ. अरुण नाटेकर, माधव घुले, प्रशांत जोशी, नारायण रत्नपारखी, हेमंत पाठक, मुकुंद कुलकर्णी, डॉ.विनय भोळे हे सल्लागार पदी नियुक्त करण्यात आले. तसेच वासुदेव रायकर, अनघा बोंद्रे, उन्मेश शेवडे, अनुजा कुलकर्णी, अनिकेत घमंडी, वैशाली कोरडे, प्रदीप म्हसकर, प्रसाद शुक्ल, अभिजित कानेटकर हे सदस्यपदी नियुक्त करण्यात आले. नव्या कार्यकारणीच्या पहिल्या बैठकीत महिला समिती, शिक्षण समिती, सांस्कृतिक समिती, जनसंपर्क आणि प्रसिद्धी समिती, युवा समिती अशा समिती नेमण्यात आल्या असून आगामी बैठकीत त्या समितीमध्ये कार्यरत असणा-या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे प्रभुघाटे यांनी सांगितले. पण ब्राह्मणांनी एकत्र येणे ही काळाची गरज असून संघटीतपणे कार्यरत असणे आवश्यक आहे, त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने ज्ञातींसह महासंघाचे सभासद व्हा असे आवाहन यावेळी करण्यात आले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.