कोडोलीतील नाताळ न करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:23 IST2020-12-22T04:23:31+5:302020-12-22T04:23:31+5:30
गोव्यानंतर कोडोली येथे नाताळ उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. परिसरातील सर्व जातिधर्मांतील नागरिक एकत्रित उत्सवात सहभागी ...

कोडोलीतील नाताळ न करण्याचा निर्णय
गोव्यानंतर कोडोली येथे नाताळ उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. परिसरातील सर्व जातिधर्मांतील नागरिक एकत्रित उत्सवात सहभागी होत असतात. त्यामुळे येथे जत्रेचे स्वरूप येत होते. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे चालू वर्षी हा उत्सव साजरा न करता शासनाच्या नियमाच्या अटी व शर्तीचे पालन करून शुक्रवारी (दि. २५) भक्ती घेण्यात येणार आहे. केसीसी चर्चची भक्ती सकाळी १० वाजता, तर केडीसी चर्चची भक्ती दुपारी १ वाजता होणार आहे. नाताळ दिवशी भक्तीशिवाय अन्य कार्यक्रम होणार नाहीत, असे दोन्ही चर्चच्या वतीने ठरविण्यात आले आहे. दान आलेल्या वस्तूंचा लिलाव हे कार्यक्रम ज्या त्या वेळीच होतील. नाताळ कालावधीमध्ये लोकांनी गर्दी करू नये व व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे स्टॉल, खेळाची दुकाने लावू नये. सर्वांनी कोरोना संक्रमण टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी रेव्ह आशितोस आवळे, सेक्रेटरी शमवेल गायकवाड, रवींद्र तळसंदेकर, प्रवीण महापुरे, नितीन चोपडे, अनिल महापुरे, डॅनियल गायकवाड, दत्ता महापुरे, अब्राहम काळे, डॅनियल माने उपस्थित होते.