शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

रिक्षातून विद्यार्थी वाहतूक : प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय,पालकांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 11:28 IST

रिक्षामामा आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहेत. रिक्षातून विद्यार्थी वाहतूक आमच्या सोईची आहे. ती बंद झाली तर आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. आॅटोरिक्षा विद्यार्थी वाहतूकप्रश्नी रविवारी जिल्हा काँग्रेस भवन येथे रिक्षाचालक व पालकांचा मेळावा आयोजित केला होता. त्यात पालकांकडून हा सूर उमटला. अध्यक्षस्थानी महापौर सूरमंजिरी लाटकर होत्या.

ठळक मुद्देप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय,पालकांची भावनाविद्यार्थी वाहतूक आॅटोरिक्षा चालक-पालक मेळावा

कोल्हापूर : रिक्षामामा आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहेत. रिक्षातून विद्यार्थी वाहतूक आमच्या सोईची आहे. ती बंद झाली तर आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. आॅटोरिक्षा विद्यार्थी वाहतूकप्रश्नी रविवारी जिल्हा काँग्रेस भवन येथे रिक्षाचालक व पालकांचा मेळावा आयोजित केला होता. त्यात पालकांकडून हा सूर उमटला. अध्यक्षस्थानी महापौर सूरमंजिरी लाटकर होत्या.मेळाव्यात आॅटो रिक्षा विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील म्हणाले, १२ वर्षांखालील किमान १० मुलांना रिक्षातून प्रवास करण्याची परवानगी द्यावी. तसेच पालकांनाही दोन पाल्यांना दुचाकीवरून सोडण्यास मुभा द्यावी, अशी आव्हान याचिका मंगळवारी (दि. १७) उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत दाखल केली जाईल. जर न्यायालयाने कायदा करून थांबण्यास सांगितले तर आम्ही रिक्षाचालक थांबू, असेही या मेळाव्यात स्पष्ट केले.त्यावर सर्व शाळांतील सर्व पालकांनी तुम्ही आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहात. तुमचा व्यवसाय व आमची सोय तुम्ही बघता; त्यामुळे कायदा झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू . यासोबतच आर्थिक मदतही करू, अशी ग्वाही दिली. यात पालकांनी वर्षाकाठी १३ ते २० हजार इतका खर्च बसला होणार आहे. त्याच्या निम्म्याहून अधिक खर्चात आम्हाला ही सेवा रिक्षाचालक विनातक्रार दरवर्षी देतात. त्यामुळे याचाही सहानभूतिपूर्वक विचार होणे गरजेचे आहे, असे मत अनेक पालकांनी व्यक्त केले.महापौर लाटकर म्हणाल्या, शैक्षणिक वर्ष संपण्यास तीन महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे अशा प्रकारे निर्णय झाल्यास पालकांना व त्यावर निर्भर असणाऱ्या रिक्षाचालकांनाही ते परवडणारे नाही. प्रसंगी आंदोलन झाल्यास त्यात आम्हीही शहराच्या प्रथम नागरिक म्हणून सहभागी होऊ.यावेळी नगरसेवक अशोक जाधव, कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, रिक्षाचालक संघटनेचे शशिकांत ढवण, अण्णा जाधव, प्रताप शिंदे, हणमंत पोवार यांच्यासह शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षण उपसंचालकांची पुन्हा भेटविद्यार्थी व पालकांची गैरसोय झाली आहे. सहा दिवसांपूर्वी याबाबतचे निवेदन कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे उपसंचालकांना दिले होते. त्यात शिक्षण विभागाने काय कार्यवाही केली, याची माहिती घेण्यासाठी आज, सोमवारी पालक कृती समिती शिक्षण उपसंचालकांची भेट घेणार आहे.एक महिन्याचे मानधन जाहीरमेळाव्यासाठी मुद्दाम उपस्थित राहिलेले, पेशाने शिक्षक असलेले नगरसेवक अशोक जाधव यांनी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांच्या न्याय्य लढ्यासाठी व उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी येणाऱ्या खर्चाकरिता स्वत:चे महिन्याचे मानधन जाहीर केले. 

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर