‘आयजीएम’ कागदोपत्री प्रलंबित नामकरणाचे काम पूर्ण करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:29 IST2021-09-04T04:29:15+5:302021-09-04T04:29:15+5:30
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयाची इमारत व कर्मचारी निवासस्थानाच्या कागदोपत्री शासनाचे नाव लावण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय प्रांत ...

‘आयजीएम’ कागदोपत्री प्रलंबित नामकरणाचे काम पूर्ण करण्याचा निर्णय
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयाची इमारत व कर्मचारी निवासस्थानाच्या कागदोपत्री शासनाचे नाव लावण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे रुग्णालयाच्या विकासकामांत येणारी अडचण दूर होईल आणि लवकरच रुग्णालय सुसज्ज होईल, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी बैठकीत सांगितले.
येथील नगरपालिकेचे आयजीएम हॉस्पिटल २०१६ ला राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे त्याचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम) हे नाव बदलून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय असे करण्यात आले आहे. परंतु कागदोपत्री या नावाची नोंद झाली नसल्यामुळे शासकीय प्रक्रियेत विकासकामाला अडचणी येत आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार आवाडे यांच्या मागणीवरून शुक्रवारी प्रांत कार्यालयात बैठक झाली. बैठकीत नावाची नोंद करण्याचा निर्णय झाला. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर तहसीलदार शरद पाटील, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, शशिकांत पाटील, बबन खोत, प्रकाश दत्तवाडे, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी ०३०९२०२१-आयसीएच-०६
इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयाचे कागदोपत्री नामकरणासाठी प्रांत कार्यालयात बैठक झाली. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, आमदार प्रकाश आवाडे, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, आदी उपस्थित होते.