चर्माेद्योग महामंडळात कर्ज घोटाळा
By Admin | Updated: December 30, 2016 00:03 IST2016-12-30T00:02:16+5:302016-12-30T00:03:09+5:30
गुन्हा दाखल : अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संगनमत; गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता

चर्माेद्योग महामंडळात कर्ज घोटाळा
प्रकाश पाटील --कोपार्डे ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा’ हा वाक्यप्रचार सार्थ करण्याचे काम पासार्डे (ता. करवीर) येथील मल्ल विजय पाटील याने केले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या ५७ किलो वजनी गटात गादी विभागात विजय पाटील याने सलग दोन वर्षे सुवर्णपदकांची कमाई केली. या कामगिरीने त्याने गवंडी असलेल्या वडिलांच्या कष्टाला आपल्या मेहनतीने सुवर्ण कोंदण निर्माण केले आहे.
आपली ऐपत नसतानाही बाजीराव पाटील यांनी विजयला कुंभी कासारीच्या कुस्ती संकुलामध्ये दाखल केले. येथे प्रशिक्षक तानाजी पाटील व प्रकाश पाटील यांनी त्याच्या मनगटातील ताकद व कुस्तीतील डावावर असणारी हुकूमत निर्माण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. या दरम्यान तो शालेय कुस्ती स्पर्धाही गाजवू लागला. मागील वर्षी विजयची कॅडेट कुस्तीमध्ये ‘आशियाई चॅम्पियन’साठी चीनमध्ये झालेल्या स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्याने मागील वर्षी नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले होते. याहीवर्षी कोल्हापूर जिल्ह्यातून त्याची याच गटासाठी सुवर्णपदकाचा मानकरी होण्यासाठी मातब्बर प्रतिस्पर्धीसमोर असल्याने विजयने जिवाचे रान करून मेहनत घेतली. चाचणी स्पर्धेबरोबर महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेच्या लढतीच्या दरम्यान उपांत्य लढतीपर्यंत प्रतिस्पर्धी मल्लांवर एकतर्फी विजय मिळविले. यात कल्याण, पिंपरी, चिंचवड व लातूर जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारे मल्ल होते. उपांत्य सामन्यात सांगलीच्या बापू कोळेकरवर १० विरुद्ध ० असा एकतर्फी विजय मिळविला व अंतिम सामन्यात दिमाखदार प्रवेश केला. अंतिम सामन्यात विजयने बानगे (ता. कागल) येथील मल्ल अभिजित पाटील याच्यावर १० विरुद्ध ० अशी गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. सुवर्णपदक मिळविण्याची ही त्याची सलग दुसरी वेळ असल्याने विजयच्या पासार्डे गावी एकच जल्लोष झाला. विजय सध्या पुणे येथे सह्याद्री क्रीडा संकुलमध्ये
सराव करीत असून, त्याला विजय बराटे, दिलीप पडवळ, कृष्णात पाटील, प्रकाश पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
लहान वयातच विजयला तालमीची ओढ होती. त्याच्यातील चपळाई व स्टॅमिना पाहून लोकांमधूून त्याला पैलवान करा, असा सल्ला येत होता. आतापर्यंत त्याने विविध स्पर्धांमध्ये २२ पदके व १७ चषक पटकावून आमच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. त्याने आॅलिम्पिकमध्ये भाग घ्यावा एवढी इच्छा आहे.
- बाजीराव पाटील, वडील