आमदार निवासात तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: April 24, 2015 01:48 IST2015-04-24T01:48:37+5:302015-04-24T01:48:37+5:30

मनोरा आमदार निवासात पाचव्या मजल्यावरून पडून विजय माळी (३५) या कामगाराचा मृत्यू झाला. अपर आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार

The death of the youth in the residence of the legislator | आमदार निवासात तरुणाचा मृत्यू

आमदार निवासात तरुणाचा मृत्यू

मुंबई : मनोरा आमदार निवासात पाचव्या मजल्यावरून पडून विजय माळी (३५) या कामगाराचा मृत्यू झाला. अपर आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी संध्याकाळी ५च्या सुमारास घडली. या प्रकरणी कफपरेड पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत माळीने उडी मारून आत्महत्या केली की तोल जाऊन तो खाली पडला याचा शोध सुरू केला आहे. पाचव्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या माळीला उपचारार्थ जी.टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: The death of the youth in the residence of the legislator