जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:19 IST2021-06-04T04:19:45+5:302021-06-04T04:19:45+5:30
कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या मृतांच्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्ह्यात नवे १६०४ ...

जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा घटला
कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या मृतांच्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्ह्यात नवे १६०४ कोरोना रुग्ण आढळले असून २८ जणांचा मृत्यू झाला आहे. १२१९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ५० किंवा त्याहून जास्त मृत्युसंख्या होती ती आता तीसच्या आत आली आहे. मृत्यू कमी होणे हा मोठा दिलासा आहे.
मे महिन्यामध्ये आतापर्यंतची सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या नोंदवण्यात आली असून, ती ५० हजारांहून अधिक आहे. त्याच पद्धतीने याच महिन्यात सर्वाधिक १४५६ इतके कोरोना रुग्ण मृत्यू पावले आहेत. रोज सरासरी ५० रुग्णांचा मृत्यू झाल्याने नागरिकांबरोबरच प्रशासन आणि आरोग्य विभागदेखील चिंतेत होता. गेल्याच महिन्यात टास्क फोर्स येऊन गेल्यानंतर त्यांनीही दिलेल्या सूचनांचे पालन सुरू झाले. खासगी रुग्णालयांतील गंभीर रुग्णांना हलवण्यास प्रतिबंध करण्यात आला.
कोल्हापूर शहरात ३९३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. करवीर तालुक्यात २६१ तर, हातकणंगले तालुक्यात २०९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मृतांमध्ये सर्वाधिक सहा मृत हे अन्य जिल्ह्यातील आहेत.
चौकट
कोल्हापूर ०५
लक्षतीर्थ वसाहत, ज्योतिरामनगर, कोल्हापूर, सुर्वेनगर, कसबा बावडा
हातकणंगले ०४
वडगाव, कबनूर २, कुंभोज
शिरोळ ०३
टाकळेवाडी, जयसिंगपूर २, लाटवाडी
करवीर ०२
शिंगणापूर, कोगील
भुदरगड ०२
माळवाडी, गारगोटी
इचलकरंजी ०२
गावभाग, इचलकरंजी
आजरा ०१
उत्तूर
गडहिंग्लज ०१
हसूरचंपू
कागल ०१
हणबरगल्ली
पन्हाळा ०१
बहिरेवाडी
इतर ०६
निपाणी २, नागठाणे, नरवाड, बेल्लारी, देवगड