निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:27 IST2021-08-22T04:27:34+5:302021-08-22T04:27:34+5:30

कोल्हापूर : मौजे खानापूर (ता. भुदरगड) येथील आक्काताई बचाराम चव्हाण (वय ७५) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

कोल्हापूर : मौजे खानापूर (ता. भुदरगड) येथील आक्काताई बचाराम चव्हाण (वय ७५) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे, असा परिवार आहे. पत्रकार डी.बी. चव्हाण यांच्या त्या मातोश्री होत.

--

अशोककुमार पाटील

कोल्हापूर : रत्नाप्पा कुंभार नगर सोसायटी येथील अशोककुमार कृष्णराव पाटील (वय ७४) यांचे निधन झाले आहे. त्यांनी ५ वर्षे सोसायटीचे संचालकपद भूषविले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे, असा परिवार आहे.

--

विजय हाळदणकर

कोल्हापूर : नागाळा पार्क कनाननगर येथील विजय नारायण हाळदणकर (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्यात पत्नी, चार मुली, असा मोठा परिवार आहे.

--

विमल पोवार

कोल्हापूर : कळंबा रोड बँक एम्प्लॉईज काॅलनी येथील विमल शामराव पोवार (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे, असा मोठा परिवार आहे

--

अनिल शिंदे

कोल्हापूर : राजारामपुरी आठवी गल्ली येथील प्रा. अनिल भाऊसाहेब शिंदे-पाटील (वय ६४) यांचे गुरुवारी निधन झाले. वाठार होली मदर इंग्लिश मीडियम स्कूल येथे त्यांनी इंग्रजीचे शिक्षक म्हणून काम केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, असा परिवार आहे.

---

यशवंत इकारे

कोल्हापूर : राजोपाध्येनगर येथील यशवंत कृष्णात इकारे (सणगर) (वय ७५) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज रविवारी आहे.

--

राजाराम सावेकर

कोल्हापूर : राजारामपुरी दहावी गल्लीतील राजाराम तुकाराम सावेकर (वय ७२) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, नातवंडे असा परिवार आहे.

---

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.