निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:16 IST2021-07-08T04:16:52+5:302021-07-08T04:16:52+5:30
कोल्हापूर : न्यू एस. बी. एच. काॅलनी औरंगाबाद येथील डॉ. सर्वोत्तम अनंताचार्य जोशी मोरखंडीकर यांचे मंगळवारी कोल्हापुरात निधन झाले. ...

निधन वार्ता
कोल्हापूर : न्यू एस. बी. एच. काॅलनी औरंगाबाद येथील डॉ. सर्वोत्तम अनंताचार्य जोशी मोरखंडीकर यांचे मंगळवारी कोल्हापुरात निधन झाले. पशुसंवर्धन खात्यातून उपसंचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी औरंगाबादमध्ये प्रवचनांद्वारे श्रीमद्भगवद्गीतेचा प्रचार व प्रसार केला. श्री राघवेंद्र स्वामी मठ व ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यदेखील ते करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
फोटो ०७०७२०२१-कोल-सर्वोत्तम जोशी
शशिकला पाटील
कोल्हापूर : कसबा बावडा प्रिन्स शिवाजीनगर येथील शशिकला बाजीराव पाटील (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. ८) कसबा बावडा येथे आहे.
--
जयवंत पोवार
कोल्हापूर : कसबा बावडा येथील जयवंत पांडुरंग पोवार (वय ६१) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
---
किरण जाधव
कोल्हापूर : राजारामपुरी ११ वी गल्ली येथील किरण बाबूराव जाधव (वय ६१) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज गुरुवारी आहे.
--
कमल ऱ्हाटणकर
कोल्हापूर : मंगेशकरनगर येथील कमल सहदेव ऱ्हाटणकर (वय ७०) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
--
नारायण सांगळे
कोल्हापूर : जोतिबा डोंगर येथील नारायण दादोबा सांगळे (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
--
सुनंदा चव्हाण
कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) येथील सुनंदा सदाशिव चव्हाण (वय ७०) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
---
बायाक्का चौगले
कोल्हापूर : कसबा बावडा येथील बायाक्का आनंदराव चौगले (वय ९१) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.
--
हौसाबाई पाटील
कोल्हापूर : हसूर दुमाला (ता. करवीर) येथील हौसाबाई शिवाजी पाटील (वय ७७) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.