निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:31+5:302021-07-03T04:16:31+5:30
कोल्हापूर : गारगोटीतील प्रसिद्ध डॉक्टर हणमंत नारायण कुलकर्णी (वय ८८) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. हणमंत कुलकर्णी हे मूळचे ...

निधन वार्ता
कोल्हापूर : गारगोटीतील प्रसिद्ध डॉक्टर हणमंत नारायण कुलकर्णी (वय ८८) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. हणमंत कुलकर्णी हे मूळचे सांगलीचे. त्यांचे वैद्यकीय शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर ते लगेच शासकीय सेवेत रुजू झाले. आरोग्य विभागाचे (प्रसूतिशास्त्र) सहसंचालक म्हणून ते निवृत्त झाले. त्यांना अध्यात्माची आवड होती. सरकारी वकील ॲड मंजूषा पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात मुले डॉ. विनय कुलकर्णी, विजय कुलकर्णी, मुली मंजूषा पाटील व प्रा. अंजली कुलकर्णी तसेच सुना व नातवंडे असा परिवार आहे.
-फोटो नं ०२०७२०२१-कोल-हणमंत कुलकर्णी (निधन)
विमल शिंदे
कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथील विमल विजय शिंदे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांचे मागे सून, दोन मुली, नातवंडे, नातसुना, असा मोठा परिवार आहे.
--
मुकुंदराव पाटील
कोल्हापूर : राजोपाध्येनगर येथील मुकुंदराव बापूसो पाटील (वय ९७) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
--
बापूसो जाधव
कोल्हापूर : हणमंतवाडी (ता. करवीर) येथील बापूसो कृष्णात जाधव (वय ७७) यांचे गुरुवारी निधन झाले. पोलीस पाटील रवींद्र जाधव यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी सकाळी आहे.
---
बाबूराव पाटील
कोल्हापूर : मगदूम कॉलनी पाचगाव (ता. करवीर) येथील बाबूराव शिवाजी पाटील (गुरव) (वय ६६) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
--
सदाशिव पालकर
कोल्हापूर : मळगे खुर्द (ता. कागल) येथील सदाशिव शंकर पालकर (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन भाऊ, एक बहीण, एक मुलगा व चार मुली असा मोठा परिवार आहे.
---
गुलाब मुल्लाणी
कोल्हापूर : राजारामपुरी बारावी गल्ली येथील गुलाब मिरासो मुल्लाणी (वय ६३) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. जियारत रविवारी बागल चौक कब्रस्तान येथे आहे.
--
सुनीता पाटील
कोल्हापूर : शिवाजी पेठ वेताळ तालीम येथील सुनीता विजयसिंह पाटील (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, दीर, भावजय असा मोठा परिवार आहे.
--
आनंद पाटील
कोल्हापूर : साळोखेनगर येथील रहिवासी व कर्मचारी भविष्य निधी कार्यालय येथील लेखाधिकारी रावसाहेब पाटील (वय ५५) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज शनिवारी आहे.
--
शमशुद्दीन पठाण
कोल्हापूर : मुळे कॉलनी, हणमंतवाडी रोड येथील शमशुद्दीन गजबर (पठाण) (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
--
सुवर्णा काळे
कोल्हापूर : शिवाजी पेठ येथील सुवर्णा शामराव काळे (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
--
बापूसाो देसाई
कोल्हापूर : सालपेवाडी (ता. भुदरगड) येथील बापूसाो भैरू देसाई (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुली व नातवंडे असा परिवार आहे.
----