निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST2021-04-03T04:21:26+5:302021-04-03T04:21:26+5:30

-- विनायक हिरेमठ कोल्हापूर : अंबाई टँक रंकाळा रहिवासी व बीएसएनएलमधील कर्मचारी विनायक विरूपाक्षलिंग हिरेमठ (वय ४७) यांचे गुरुवारी ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

--

विनायक हिरेमठ

कोल्हापूर : अंबाई टँक रंकाळा रहिवासी व बीएसएनएलमधील कर्मचारी विनायक विरूपाक्षलिंग हिरेमठ (वय ४७) यांचे गुरुवारी निधन झाले. ते निसर्गवेध परिवार या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. रांगणा संवर्धन मोहिमेत २० वर्षे सक्रिय सहभागी होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

-

हैदर अली सय्यद

कोल्हापूर : कदमवाडी घाटगे कॉलनी येथील हैदर अली सय्यद (वय ८३) यांचे निधन झाले. संजीवन इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या नसीमा सय्यद यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

--

अमित मगदूम

कोल्हापूर : रमणमळा येथील अमित सुनील मगदूम (वय ३०) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, भाऊ, चुलते असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या रविवारी आहे.

--

बापूसाहेब घाटे

कोल्हापूर : कदमवाडी येथील बापूसाहेब हरी घाटे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे.

--

उषा पिष्टे

कोल्हापूर : जरग नगर येथील उषा शिवाजी पिष्टे (वय ८०) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

--

अन्वरभाई भोरी

कोल्हापूर : अन्वरभाई तय्यबअली भोरी (वय ८०) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

--

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.