निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:03 IST2021-01-13T05:03:54+5:302021-01-13T05:03:54+5:30
कोल्हापूर : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील मंदाकिनी बाळकृष्ण घाटगे (वय ८७) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात सून, ...

निधन वार्ता
कोल्हापूर : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील मंदाकिनी बाळकृष्ण घाटगे (वय ८७) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात सून, चार मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.
फोटो (१२०१२०२१-कोल-मंदाकिनी घाटगे (निधन)
सुशीला गवंडी
कोल्हापूर : त्रिमूर्ती कॉलनी कळंबा येथील सुशीला भास्कर गवंडी (वय ८५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र बंदसोडे यांच्या त्या मामी होत.
फोटो (१२०१२०२१-कोल-सुशीला गवंडी (निधन)
सिद्दाप्पा कागवाडे
कोल्हापूर : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील सिद्दाप्पा विराप्पा कागवाडे (वय ९४) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, मुले, मुलगी, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रा. एम. एस. कागवाडे यांचे ते वडील होत.
फोटो (१२०१२०२१-कोल-सिद्दाप्पा कागवाडे (निधन)
तानाजी पाटील
कोल्हापूर : शाहूपुरी कुंभार गल्ली येथील तानाजी महादेव पाटील (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
फोटो (१२०१२०२१-कोल-तानाजी पाटील (निधन)