निधन वार्ता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:57 IST2021-01-13T04:57:49+5:302021-01-13T04:57:49+5:30

शिये : भुये (ता. करवीर) येथील कृष्णा तातोबा शिंदे (वय १००) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, ...

Death talk ... | निधन वार्ता...

निधन वार्ता...

शिये : भुये (ता. करवीर) येथील कृष्णा तातोबा शिंदे (वय १००) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे. चारधाम यात्रा पायी करून आलेले गावातील ते पहिले व एकमेव व्यक्ती होते. (१००१२०२१-कोल-कृष्णा शिंदे निधन)

मंदाकिनी देसाई

कोल्हापूर : मंदाकिनी भाऊसाहेब देसाई (वय ७३) यांचे पुणे येथे निधन झाले. त्या कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब रावजी देसाई यांच्या पत्नी होत. उद्योजक मानसिंग देसाई यांच्या आई होत. (१००१२०२१-कोल-मंदाकिनी देसाई निधन)

वसंतराव खाडे

कोल्हापूर : न्यू यशवंत कॉलनी, कसबा बावडा येथील वसंतराव दत्तात्रय खाडे (वय ८५) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. (१००१२०२१-कोल-वसंतराव खाडे निधन)

आनंदीबाई जाधव

कोल्हापूर : पाटाकडील तालीमजवळ, मंगळवार पेठ येथील आनंदीबाई रामचंद्र जाधव (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. (१००१२०२१-कोल-आनंदीबाई जाधव निधन)

विजया कारेकर

कोल्हापूर : राजोपाध्येनगर येथील विजया रघुनाथ कारेकर (वय ६६) यांचे निधन झाले. दशक्रिया विधी शुक्रवारी (दि. १५) आहे. (१००१२०२१-कोल- विजया कारेकर निधन)

Web Title: Death talk ...