निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:25 IST2020-12-31T04:25:03+5:302020-12-31T04:25:03+5:30

कोल्हापूर : कदमवाडीतील कल्पना बाळासाहेब कुंभार (वय ६१) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, जावई, नातवंडे ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

कोल्हापूर : कदमवाडीतील कल्पना बाळासाहेब कुंभार (वय ६१) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या माजी मंत्री पद्मश्री देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कनिष्ठ कन्या व जनता बझारचे माजी अध्यक्ष बाळासाहेब महारुद्र कुंभार यांच्या पत्नी होत.

फोटो : ३०१२२०२०-कोल-कल्पना कुंभार (निधन)

वितरण निधन वार्ता - आनंदा जाधव

कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) येथील आनंद गणू जाधव (वय ८०) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे.

फोटो : ३०१२२०२०-कोल-आनंदा जाधव (निधन)

पार्वती पाटील

कोल्हापूर : जुना बुधवार पेठेतील पार्वती बाबूराव पाटील (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ३०१२२०२०-कोल-पार्वती पाटील (निधन)

शांताबाई लोहार

कोल्हापूर : शिरोली (पुलाची) येथील शांताबाई वसंत लोहार (वय ९०) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

सईबाई पाटील

कोल्हापूर : बोरबेट (ता. गगनबावडा) येथील सईबाई अंतू पाटील (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

सुभाष जोशी

कोल्हापूर : शाहूपुरी पहिल्या गल्लीतील सुभाष विष्णू जोशी-भेडसगावकर (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

शोभना अंबिलढोक

कोल्हापूर : प्रतिभानगरातील शोभना रंगराव अंबिलढोक (वय ७८) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे.

जयसिंगराव जाधव

कोल्हापूर : मंगळवार पेठ, जरग गल्लीतील जयसिंगराव धोंडीराम जाधव (वय ८२) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक शाखा जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांचे वडील होत.

(सर्व निधन वार्ता फोटो आहेत.)

Web Title: Death talk