निधन वार्ता ०३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:25 IST2021-05-20T04:25:19+5:302021-05-20T04:25:19+5:30
कोल्हापूर : साने गुरुजी वसाहत येथील निवृत्त शिक्षक सुधाकर बलभीम फडणीस (८२) यांचे बुधवारी कोल्हापुरात निधन झाले. अण्णाभाऊ ...

निधन वार्ता ०३
कोल्हापूर : साने गुरुजी वसाहत येथील निवृत्त शिक्षक सुधाकर बलभीम फडणीस (८२) यांचे बुधवारी कोल्हापुरात निधन झाले. अण्णाभाऊ आजरा सूत गिरणीचे सल्लागार चंद्रशेखर फडणीस यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुली असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी छाया फडणीस यांचेही मागील महिन्यातच निधन झाले. महिनाभरातच पती पत्नींनी या जगाचा निरोप घेतला. (फोटो: १९०५२०२१-कोल-सुधाकर फडणीस निधन)
धोंडिराम पाटील
पन्हाळा: पोंबरे येथील धाेंडिराम बाबू पाटील (८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. (१९०५२०२१-कोल-धोंडीराम पाटील निधन)
मनोहर काेरडे
कोल्हापूर: आझाद गल्ली, रविवारपेठ येथील मनोहर बाजीनाथ कोरडे ( ९०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. (१९०५२०२१-कोल-मनोहर कोरडे निधन)
दगडू लोखंडे
कोल्हापूर: वारनूळ (ता. पन्हाळा) येथील व सध्या शिंगणापूर येथे वास्तव्यास असलेले दगडू लहू लोखंडे दीक्षित ( ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. (१९०५२०२१-कोल-दगडू लोखंडे निधन)
शामाबाई येवारे
कोल्हापूर: सांगवडे येथील शामाबाई आदिनाथ येवारे (९३) यांचे निधन झाले. त्या राहुल ट्रेडिंगच्या रवींद्र येवारे यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली,सुना असा परिवार आहे. (१९०५२०२१-कोल-शामाबाई येवारे निधन)
सुवर्णा मोरे
कोल्हापूर: कोर्ट कॉलनी, चंबुखडी येथील सुवर्णा संपत मोरे (६०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, विवाहित मुलगी असा परिवार आहे. (१९०५२०२१-कोल-सुवर्णा मोरे निधन)
मंगल शिंदे
कोल्हापूर: भाेई गल्ली, रविवार पेठ येथील मंगल रामचंद्र शिंदे (६५) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात भावजय, भाची,भाचे, सून असा परिवार आहे. (१९०५२०२१-कोल-मंगल शिंदे निधन)
पंकज सूर्यवंशी
कोल्हापूर: लक्ष्मी कॉलनी टेंबलाईवाडी येथील पंकज अशोक सूर्यवंशी यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, आई, बहीण, आजी असा परिवार आहे. (१९०५२०२१-कोल-पंकज सूर्यवंशी निधन)