निधन वार्ता ०१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:26+5:302021-01-17T04:22:26+5:30
कोल्हापूर : किणी ता. हातकणंगले व सध्या राहणार राजारामपुरी पहिली गल्ली येथील एस. के. माळी (८०) यांचे शनिवारी ...

निधन वार्ता ०१
कोल्हापूर : किणी ता. हातकणंगले व सध्या राहणार राजारामपुरी पहिली गल्ली येथील एस. के. माळी (८०) यांचे शनिवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी २७ वर्षे काम केले होते. काँग्रेसच्या जिल्ह्यातील पाच दशकांच्या वाटचालीचे ते साक्षीदार होते. काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ते परिचित होते. वीरशैल लिंगायत माळी समाजाचे जिल्हाध्यक्ष, वीज कामगार संघटक इंटकचे सरचिटणीसपदही त्यांनी भूषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. शनिवारी रात्री त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
(फोटो: १६०१२०२१-कोल-एस.के.माळी निधन)
अनिष वणकुंद्रे
कोल्हापूर: लक्ष्मीपुरी येथील अनिष अमर वणकुंद्रे (१७) याचे गुरुवारी निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.
(फोटो: १६०१२०२१-कोल-अनिष वणकुंद्रे निधन)