निधन वार्ता ०१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:22 IST2020-12-22T04:22:53+5:302020-12-22T04:22:53+5:30
कोल्हापूर : सावित्रीबाई फुले हाॅस्पिटल परिसरातील श्रीकांत दत्तात्रय भोसले (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, ...

निधन वार्ता ०१
कोल्हापूर : सावित्रीबाई फुले हाॅस्पिटल परिसरातील श्रीकांत दत्तात्रय भोसले (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे. ते सामाजिक कार्यकर्ते इंद्रजित भोसले यांचे वडील होत.
वाणिज्य निधन वार्ता : शकुंतला कांबळे
कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहतीतील शकुंतला भगवंत कांबळे (वय ६५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे. त्या लातूरचे उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांच्या त्या मातोश्री होत.
(वितरण विभाग : अकबर शेख
कोल्हापूर : कसबा बावडा मेन रोडवरील अकबर बाबालाल शेख (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. जियारत उद्या, बुधवारी सकाळी आहे.
संदीप तिवले
कोल्हापूर : संदीप बळवंत तिवले (वय ३९) यांचे रविवारी (दि.२०) निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. ते कोल्हापूर महापालिकेचे शहर पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी होत.
मानसिंगराव भोसले
कोल्हापूर : रुईकर काॅलनीतील मानसिंगराव गोविंदराव भोसले-सरकार (वय ८०) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे.
शिवराज आबिटकर
कोल्हापूर : अंबाई टँक, रंकाळा पार्कातील शिवराज कृष्णराव आबिटकर (वय ५१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा भाऊ, आई असा परिवार आहे.
(सर्व निधन वार्ता फोटो आहेत)