.विद्युत उपकरणाच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

By Admin | Updated: December 18, 2014 00:28 IST2014-12-18T00:26:22+5:302014-12-18T00:28:44+5:30

पट्टणकोडोलीतील घटना; प्रदर्शनासाठी तयार केले होते उपकरण

Death of student by electric shoe | .विद्युत उपकरणाच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

.विद्युत उपकरणाच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

पट्टणकोडोली : विज्ञान प्रदर्शनासाठी तयार केलेले ‘विद्युत पाळणा’ उपकरण मित्रांना चालू करून दाखविताना विजेचा जोरदार धक्का बसल्याने एका शाळकरी मुलाचा आज, बुधवारी दुपारी मृत्यू झाला. आदेश परशराम कांबळे (वय १४) असे त्याचे नाव असून, तो पट्टणकोडोली येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गात शिकत होता. याबाबत शाळेच्या प्रशासनाला जबाबदार धरत संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह घेऊन आलेल्या शववाहिकेसह शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यांनी मुख्याध्यापकांना धारेवर धरले.
पट्टणकोडोली येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत उद्या, गुरुवारी स्वच्छता अभियानांतर्गत भेट देण्यासाठी समिती येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमवेत स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. आज, बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता सर्व विद्यार्थी शाळेचा परिसर स्वच्छ करीत होते. यावेळी सातवीतील दोन विद्यार्थ्यांना खुरपे आणण्यासाठी मुख्याध्यापक आण्णासो आवटे यांनी घरी पाठविले. या विद्यार्थ्यांबरोबर आदेश कांबळे हासुद्धा गेला. ते तिघेजण आदेशने विज्ञान प्रदर्शनासाठी बनविलेला ‘विद्युत पाळणा’ हे उपकरण पाहण्यासाठी त्याच्या घरी गेले. आदेशने तयार केलेला विद्युत पाळणा मित्रांना दाखविण्यास सुरुवात केली. यावेळी पाण्यातून आलेली वायर त्याने विद्युत बोर्डामध्ये घातली. त्यानंतर आदेशने पाळण्यास हात लावताच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यावेळी दोघे मित्र व त्याचे आजोबा यांनी आदेशला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदेशचा जागीच मृत्यू झाला. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. शवविच्छेदनावेळी आदेशची आई मंगल कांबळे व वडील परशराम कांबळे यांनी आदेशच्या डोळ्यांचे दान केले. या घटनेला जबाबदार धरत संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी शववाहिनीसह शाळेवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. यामध्ये तरुणांसह महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मृताच्या नातेवाइकांना भरपाई देण्याचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी कबूल केल्याने आंदोलनकर्त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
चौकट....
आदेशचे नेत्रदान
आदेशला वेगवेगळे प्रयोग करून विविध उपकरणे करण्याचा छंद होता. आदेशच्या आई-वडिलांनी त्याचे नेत्रदान करून एका अंधाला जग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. डोंगराएवढे दु:ख असूनही माणुसकीला पाझर फोडणाऱ्या या निर्णयामुळे त्याची आई व वडिलांनी समाजापुढे एक आदर्श घडवून दिला.
१) पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेसमोर शाळकरी मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे ठिय्या आंदोलन करत जमावाने गर्दी केली. (१७ पट्टणकोडोली०२)
२) आदेश कांबळे याचा मृतदेह घेऊन आलेली शववाहिका शाळेसमोरच नातेवाईकांनी उभी करत शाळेलाच त्याच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार धरल

Web Title: Death of student by electric shoe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.