विष प्राशनाने वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:25 IST2021-03-31T04:25:20+5:302021-03-31T04:25:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कागल तालुक्यातील बोरवडे येथे वृद्धाने राहत्या घरी पिकावर मारणारे तणनाशक प्राशन केले. मंगळवारी सकाळी ...

Death of an old man by poisoning | विष प्राशनाने वृद्धाचा मृत्यू

विष प्राशनाने वृद्धाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कागल तालुक्यातील बोरवडे येथे वृद्धाने राहत्या घरी पिकावर मारणारे तणनाशक प्राशन केले. मंगळवारी सकाळी ही घटना घडली, त्यांना तातडीने बेशुद्धावस्थेत सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; पण उपचारापूर्वीच त्यांच्या मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

केर्लीजवळ अपघातात जखमी

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील केर्ली नजीक झालेल्या अपघातात सुनीता कृष्णात बजागे (४५, रा. पडवळवाडी, ता. करवीर) ह्या गंभीर जखमी झाल्या. त्या वडणगेकडे जाताना ही दुर्घटना घडली. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

दुचाकीस्वार जखमी

कोल्हापूर : येथील हॉकी स्टेडीयमजवळ भरधाव दुचाकीचा अपघात होऊन त्यावरील संजय श्रीपती भोईटे (५२, रा. हासूर दुमाला, ता. करवीर) हे जखमी झाले. मंगळवारी दुपारी हा अपघात घडला. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Death of an old man by poisoning