शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निकालादिवशीच नववीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू : इंदूमती गर्ल्समध्ये घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:11 IST

कोल्हापूर : नववी पास होऊन दहावीत नक्की जाणार अशी तिला खात्री होती. त्याच आनंदात ती निकाल आणावयास गेली.

ठळक मुद्देमृदूलाला त्र्यंबोली यात्रेत होता कोहळा पूजनाचा मान

कोल्हापूर : नववी पास होऊन दहावीत नक्की जाणार अशी तिला खात्री होती. त्याच आनंदात ती निकाल आणावयास गेली. गल्लीत सगळ््यांना पेढे घेवून येते बघा, असेही सांगून गेली, परंतु नियतीने तिच्या जीवनात हा पेढे वाटण्याचा आनंद येऊ दिला नाही. शाळेत चक्कर आल्याचे निमित्त होऊन तिचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मंगळवारी सकाळी निधन झाले. मृदुला संतोष गुरव (वय १३, रा. गुरव गल्ली, बिनखांबी गणेश मंदिराजवळ कोल्हापूर) असे तिचे नाव.कोल्हापुरातील त्र्यंबोली, रंकोबा, जोतिबा, महाकाली, फिरंगाई आदी देवस्थानचे पारंपरिक गुरव म्हणून संतोष गुरव काम पाहतात. त्यांची मृदूला ही मुलगी. नवरात्रौत्सवात त्र्यंबोली देवीच्या ललिता पंचमी सोहळ्यात मृदूलाला तीन वर्षे कोहळा पूजनाचा मान मिळाला होता. ती इंदूमती देवी गर्ल्स हायस्कूलमध्ये नववीत शिकत होती. सध्या तिची दहावीची तयारी सुरू होती. निकाल आणण्यासाठी सकाळी आठच्या सुमारास शाळेत गेल्यानंतर तिला चक्कर आली. शिक्षकांनी तत्काळ तिला सीपीआर रुग्णालयात दाखल केले व पालकांना बोलावून घेतले. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. घरांतून जाताना हसत खेळत आनंदात गेलेल्या मुदृलाचे दुपारी पार्थिवच घरी आले. हा धक्का तिच्या कुटुंबियांसह वर्गातील मैत्रिणींनाही सहन झाला नाही. सारेजण धाय मोकलून रडत होते.तिला लहानपणी हृदयविकाराचा त्रास झाला होता. परंतु हृदयशस्त्रक्रिया झाल्यानंतर तिचे जीवन सुलभ झाले होते. प्रकृतीही उत्तम होती. त्यामुळे नवरात्रौत्सवात ललिता पंचमीला होणाऱ्या त्र्यंबोली देवीच्या यात्रेत प्रचंड गर्दीतही कोहळा पूजनाच्या कार्यक्रमास ती हौसेने गेली तीन वर्षे उपस्थित राहत असे. तिच्या हस्तेच हा सोहळा होई. एका देवीशी संबंधित धार्मिक विधी मृदूला करत होती व तिचे लोकांनाही अपू्रप वाटायचे. त्यामुळे तिच्या अशा अचानक निधनाने अनेकांच्या मनाला चटका बसला.मृदूला नववीत पास..मृदूला नववीतही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे परंतु हा निकाल पाहायला ती आज या जगात नाही. तिच्या मागे आजी, आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू