निधन बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:22 IST2021-05-19T04:22:55+5:302021-05-19T04:22:55+5:30
गडहिंग्लज : येथील आबासाहेब ऊर्फ भास्कर गोपाळराव देसाई (सध्या रा. पुणे, वय ३९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, ...

निधन बातम्या
गडहिंग्लज : येथील आबासाहेब ऊर्फ भास्कर गोपाळराव देसाई (सध्या रा. पुणे, वय ३९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. पाटबंधारे विभागाचे निवृत्त कर्मचारी गोपाळराव देसाई यांचा मुलगा तर गडहिंग्लज कारखान्याचे संचालक दीपकराव जाधव यांचे ते जावई होत. रक्षाविसर्जन बुधवारी (दि. १९) सकाळी आहे.
* भास्कर देसाई : १८०५२०२१-गड-०२
------------------------
२) विजयकुमार गवळी यांचे निधन
गडहिंग्लज : शहरातील लाटकर गल्ली येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार आप्पया गवळी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका वत्सला गवळी यांचे ते पती होत.
* विजयकुमार गवळी : १८०५२०२१-गड-०३
------------------------
३) तुकाराम सुतार यांचे निधन
पेरणोली : पेरणोली (ता. आजरा) येथील तुकाराम शिवराम सुतार (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन, गुरुवारी (दि. २०) सकाळी ९ वाजता आहे.
* तुकाराम सुतार : १८०५२०२१-गड-०४