मल्लय्या स्वामी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:24 IST2021-04-16T04:24:34+5:302021-04-16T04:24:34+5:30
इचलकरंजी : लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते, व्यंकटेश सहकारी सूतगिरणीचे संस्थापक मल्लय्या दत्तात्रय स्वामी (वय ८७) यांचे गुरुवारी निधन झाले. ...

मल्लय्या स्वामी यांचे निधन
इचलकरंजी : लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते, व्यंकटेश सहकारी सूतगिरणीचे संस्थापक मल्लय्या दत्तात्रय स्वामी (वय ८७) यांचे गुरुवारी निधन झाले. यंत्रमाग कामगारांना मालक बनविणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.
नगराध्यक्षा अलका स्वामी यांचे सासरे व वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांचे वडील मल्लय्या स्वामी यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. वीरशैव सहकारी बॅँकेचे अध्यक्ष, लिंगायत समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष, वीरशैव लिंगायत समाज सिवीक बोर्डाचे अध्यक्ष, वरद-विनायक मंदिर मंडळाचे अध्यक्ष, आदी पदे त्यांनी भूषवली.
गुरुवारी पहाटे मल्लय्या यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर लिंगायत रूद्रभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक मदन कारंडे, शशांक बावचकर, रवींद्र माने, प्रकाश मोरबाळे, वीरशैव बॅँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे, गजानन सुलतानपुरे, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
१५०४२०२१-आयसीएच-०७-मल्लय्या स्वामी