हभप भानुदास महाराज यांचे देहावसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:27 IST2021-05-20T04:27:13+5:302021-05-20T04:27:13+5:30
कोल्हापूर : येथील वारकरी संप्रदायातील अध्वर्यू, सुप्रसिद्ध प्रवचनकार, कपर्तनकार, ह.भ.प.भानुदास महाराज यादव (वय ६५, रा. साकोली कॉर्नर) यांचे मंगळवारी ...

हभप भानुदास महाराज यांचे देहावसान
कोल्हापूर : येथील वारकरी संप्रदायातील अध्वर्यू, सुप्रसिद्ध प्रवचनकार, कपर्तनकार, ह.भ.प.भानुदास महाराज यादव (वय ६५, रा. साकोली कॉर्नर) यांचे मंगळवारी दुपारी कोरोनामुळे देहावसान झाले.
रामचंद्र महाराज यादव यांचे सुपुत्र असलेल्या भानुदास महाराजांनी कोल्हापूर व पंढरपूर मठाचे उत्तराधिकारी म्हणून पारमार्थिक परंपरा जतन केली होती. गुरुवर्य साखरे महाराज संपादित सार्थ ज्ञानेश्वरी, विचार सागर, सार्थ अमृतानुभव, सार्थ चांगदेव पासष्टी यासारख्या अनेक ग्रंथांचे त्यांनी पुनःसंपादन व प्रकाशन केले होते. आपल्या कीर्तन, भजन व प्रवचनातून त्यांनी सातत्याने समाज प्रबोधन केले. कोल्हापूर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे ते प्रमुख होते.
येथील करवीर काशी फाऊंडेशन प्रमुख सल्लागार म्हणून गेली २० वर्षे ते सांस्कृतिक-सामाजिक चळवळीत सहभागी होते. वारकरी साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार, ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांच्या हस्ते वारकरी जीवन पुरस्कार, स्वामी अमलानंद भक्त मंडळाचे वतीने स्वामी अमलानंद सेवा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक वारकरी दिंडींचे ते मार्गदर्शक होते. त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ ह.भ.प.महादेव तथा बंडा महाराज,पुतणे,बहिणी असा परिवार आहे.
१९०५२०२१ कोल भानुदास महाराज