कोल्हापूरात गटारीत पडून सफाई कामगाराचा मृत्यू

By Admin | Updated: May 13, 2017 17:36 IST2017-05-13T17:36:01+5:302017-05-13T17:36:01+5:30

अतिमद्यप्राशनाने दुर्घटना

Death of a clean worker by falling into a gutter in Kolhapur | कोल्हापूरात गटारीत पडून सफाई कामगाराचा मृत्यू

कोल्हापूरात गटारीत पडून सफाई कामगाराचा मृत्यू

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १३ : रेसकोर्स नाका, संभाजीनगर येथील कामगार चाळी शेजारील गटारीत पडून सफाई कामगाराचा मृत्यू झाल्याचे शनिवारी पहाटे उघडकीस आले. जितेश हरी वाघेला (वय २७) असे त्याचे नाव आहे. अतिमद्यप्राशनाने ही घटना घडल्याचे नातेवाईक व पोलिसांनी सांगितले.

याबाबतची अधिक माहिती अशी, जितेश वाघेला हा खासगी सफाई कामगार म्हणून काम करीत होता. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्याने आईने त्याच्यासह दोन मुलांना मोलमजुरी करून लहानाचे मोठे केले. जितेश हा दारूच्या आहारी गेला होता. शुक्रवारी रात्री तो दारू पिऊन घरी आला. जेवण करून पुन्हा घराबाहेर पडला, तो परत आलाच नाही.

शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास घराच्या पाठीमागील सरकारी शौचालया शेजारील गटारीमध्ये तो बेशुद्धावस्थेत मिळून आला. त्याला तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचा मृतदेह पाहून आई, भावंडांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. याबाबत जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Web Title: Death of a clean worker by falling into a gutter in Kolhapur