गव्हाची पोती अंगावर पडलेल्या हमालाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:21 IST2021-03-24T04:21:41+5:302021-03-24T04:21:41+5:30
कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी गव्हाची पोती घसरून अंगावर पडल्याने त्याखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या हमालाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. ...

गव्हाची पोती अंगावर पडलेल्या हमालाचा मृत्यू
कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी गव्हाची पोती घसरून अंगावर पडल्याने त्याखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या हमालाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. शाम विंदेश्वर राऊत (३५, रा. केदारलिंग फ्लोअर मिल, गोकुळ शिरगाव. मूळ रा. बंदरझुला सितामठी, बिहार) असे मृताचे नाव आहे.
गोकुळ शिरगाव येथील केदारलिंग फ्लोअर मिलमध्ये गोदामात शाम राऊत हे हमालीचे काम करीत होते. शुक्रवारी (दि. १९) रात्री मिलमध्ये गव्हाची पोती उतरत असताना त्यातील एक पोते घसरुन त्यांच्या अंगावर पडले. या पोत्याखाली सापडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना शनिवारी सकाळी सीपीआर रुग़्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांचा मंगळवारी सकाळी रुग़्णालयात मृत्यू झाला. त्याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे. त्यांचा मृतदेह पोलीस पंचनामा केल्यानंतर नातेवाईकांनी विमानाने बिहारकडे रवाना केला.