शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

मूक-कर्णबधिर असोसिएशनच्या रौप्य महोत्सवानिमित्त स्नेहमेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 3:40 PM

मूक-बधिर मुलांना बोलते करत त्यांना मुख्य प्रवाहात आणून सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगण्यासाठी नवी उमेद निर्माण करणाऱ्या मूक -कर्णबधिर असोसिएशनच्या रौप्य महोत्सवानिमित्त स्नेहमेळावा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

ठळक मुद्देमूक-कर्णबधिर असोसिएशनच्या रौप्य महोत्सवानिमित्त स्नेहमेळावा उत्साहातजगण्यासाठी मिळाली नवी उमेद

कोल्हापूर : मूक-बधिर मुलांना बोलते करत त्यांना मुख्य प्रवाहात आणून सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगण्यासाठी नवी उमेद निर्माण करणाऱ्या मूक -कर्णबधिर असोसिएशनच्या रौप्य महोत्सवानिमित्त स्नेहमेळावा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.शाहू मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक भवन येथे स्नेहमेळाव्याचे उद्घाटन माजी महापौर सागर चव्हाण, माजी नगरसेवक आदिल फरास यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमातून आम्हाला जगण्यासाठी नवी उमेद मिळाली, असे अनेकांनी भावना व्यक्त केली.ऐकायला येत नाही म्हणून बोलताही येत नाही. त्यांना मूकबधिर म्हणूनच त्यांची गणना होते. स्वत:च्या या व्यंगामुळे आत्मविश्वास गमावून बसले आणि कुचेष्टेच्या भीतीने सामान्यजनांपासून चार हात दूर राहाणे पसंत करतात. मात्र या सर्वांना एकत्र करत त्यांच्या स्वप्नांना उंच भरारीसाठी पंखाचे बळ देण्यासाठी या निमित्ताने सांस्कृ तिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सुमारे तीस मूक -बधिरांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. मूकबधिर बांधवांना सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून त्यांना कार्यक्रमाची रुपरेषा पाठवली होती. सुमारे सातशेहून अधिक सभासद उपस्थित राहिले.असोसिएशनचे अध्यक्ष उद्धव पन्हाळकर यांनी संस्थेची भूमिका मांडली. सल्लागार राहुल चव्हाण यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.

यावेळी मुंबईचे सुनील सहस्त्रबुध्दे, अमोल घागरे, राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशनचे जालनाचे अध्यक्ष मनोज पटवारी, मुंबईचे सचिव प्रदीप मोरे, नाशिकचे जयसिंग काळे, मुंबई स्पोर्टस्चे कौन्सिल आॅफ दि डेफ पुणेचे उपाध्यक्ष अशोक मोरे, महाराष्ट्र अध्यक्ष ईर्शाद खान, गोपाळ बिरारे, चेतन जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित सभासदांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन जिल्ह्याचे उपाध्यक्ष अतुल फणसाळकर, सेक्रेटरी अमोल गवळी, उप सेक्रेटरी अतुल भाळवणे, गौरव शैलार, तेजस मुरगुडे, संतोष मिठारी, अमोल कवाळे, धीरज कांबळे, जयश्री गवळी, प्रियांका महामुनी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.व्हिडिओ कॉलद्वारे संवादमूकबधिर व्यक्तींच्या परस्पर संवादावर बंधने असली, तरी खाणाखुणा करून त्या एकमेकांशी संवाद साधू शकतात; मात्र फोनवरून असा संवाद साधणे अशक्य होते. काहींना काही कारणास्तव मेळाव्यास येता आला नाही, अशा एका नरेश साळवी या मूक-बधिर बांधवाने व्हिडिओ कॉलद्वारे सांकेतिक भाषेत संवाद साधत गैरहजर राहिलेल्या आपल्या मित्राला सभागृहातील वातावरण दाखवत होता.६० जणांची नोंदणीरौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे ६० मुला-मुलींनी नोंदणी केली.खेळाडूंचा सत्कारअसोसिएशनच्यावतीने संतोष चंद्रकांत मिठारी, सुबिया मुल्लाणी, आदेश रुकडीकर, रोहित शिकलगार, अमृता जाधव, धीरज कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. 

 

टॅग्स :Divyangदिव्यांगkolhapurकोल्हापूर