गंगावेशनजीक तरुणावर प्राणघातक तलवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST2021-09-21T04:28:00+5:302021-09-21T04:28:00+5:30

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून झालेल्या तलवार हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. नीलेश बाबूराव जाधव (वय ३५, रा. बुधवार पेठ) असे ...

Deadly sword attack on a youth near Gangaveshan | गंगावेशनजीक तरुणावर प्राणघातक तलवार हल्ला

गंगावेशनजीक तरुणावर प्राणघातक तलवार हल्ला

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून झालेल्या तलवार हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. नीलेश बाबूराव जाधव (वय ३५, रा. बुधवार पेठ) असे जखमींचे नाव आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गंगावेश ते रंकाळा स्टॅण्ड मार्गावर पाडळकर मार्केटजवळ घडली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तिघांना अटक केली असून, पाच संशयितांवर गुन्हा दाखल झाला.

स्वप्नील राजेंद्र चिले (वय २२), आशिष ऊर्फ हृषीकेश राजेंद्र चिले (२४ दोघेही रा. यादव गल्ली), निखिल नितीन पुणेकर (२८ रा. काळआई मंदिरनजीक, सुतारमाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोन अनोळखी संशयीतांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गंगावेश येथील जाधव गल्लीत गौरव जाधव हे राहतात. त्यांचा चुलत भाऊ नीलेश जाधव हे रविवार गणेश विसर्जनादिवशी रात्री साडे आकरा वाजता मोबाइलवर बोलत बाहेर गेले होते. त्यावेळी पूर्ववैमनस्यातून संशयित स्वप्नील चिले, आशिष ऊर्फ हृषीकेश चिले, निखिल पुणेकर व त्याच्या दोघा साथीदारांनी वादावादी केली. त्यातून पाच जणांनी तलवार, रॉड, दांडक्याने नीलेश जाधव यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. बेशुद्धावस्थेत त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. याबाबतची तक्रार अगौरव जाधव यांनी पोलिसांत दिली. त्यानुसार पाचही संशयितांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे, इतरांचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Deadly sword attack on a youth near Gangaveshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.