शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: लिंगनूर, दुगूनवाडीत भरदिवसा हत्ती; मका, ऊस, केळी, नारळ पिकांचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 14:17 IST

हत्तीने भर दिवसा गावात प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली.

नेसरी : लिंगनूर तर्फ नेसरी, दुगूनवाडी (ता. गडहिंग्लज) येथे भर दिवसा टस्कर हत्तीने गावात प्रवेश केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुगूनवाडी भागात मंगळवारी (२५) रात्रीपासून चारापाण्याच्या शोधात आलेल्या हत्तीने भर दिवसा गावात प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली.दुगूनवाडीतील महादेव मंदिराजवळ महिलेला हत्तीचे दर्शन झाले. तिने आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेतली. हत्ती गावात आल्याचे समजताच नागरिकांची हत्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. रात्री मुंगूरवाडीनजीकच्या ओढ्यातून लिंगनूर तर्फ नेसरी या गावात प्रवेश केला होता.दैनंदिन कामाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्यांची काहीवेळ भंबेरी उडाली. हत्ती शांतपणे गावातील रस्त्यावरून जात होता. काही हुल्लडबाजांनी ओरडाओरडा करून हत्तीला बिथरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सकाळी ११ वाजेनंतर हत्ती लिंगनूरहून हेब्बाळ-जलद्याळ, मांगनूर तर्फ सावतवाडी शिवारात गेला. काही हुल्लडबाजांमुळे हत्ती बिथरण्याची शक्यता असून, वनविभागाने तातडीने या हत्तीला सुरक्षितस्थळी पाठवावे, अशी मागणी होत आहे. अर्जुनवाडी, नेसरी, शिप्पूर तर्फ नेसरी, बतकणंगले, हेब्बाळ-जळद्याल मार्गे लिंगनूर, दुगूनवाडी, मुंगूरवाडी परिसरात हा हत्ती गेल्याचा अंदाज आहे.फेब्रुवारीपासून अर्जुनवाडी, तळेवाडी डोंगर भागत त्याचा वावर आहे. चार दिवसांपूर्वी हत्ती रात्री बाराच्या सुमारास नेसरीकरांना दिसला होता. हत्तीने ऊस, नारळ, केळी पिकांसह पाण्याच्या टाकींचे नुकसान केले आहे. सध्या काजू हंगाम सुरू असून, शेतकरी काजू गोळा करत आहे. हत्ती आल्याने शेतकरी जीव मुठीत घेऊन शेतीची कामे करावी लागत आहेत. हत्ती बिथरू नये यासाठी नागरिकांनी हुल्लडबाजी करणे टाळावे, असे आवाहन वनपाल भंडारी यांनी केले आहे.गव्यांचाही त्रास सुरूच मंगळवारी रात्री बटकणगंलेचे प्रगतिशील शेतकरी प्रमोद जाधव यांच्या शेतातील मटकर शेरी नावाच्या शेतातील काढणीला आलेला मका गव्यांनी फस्त केला. सुमारे एक एकर क्षेत्रातील मका व ऊस पिकाचे मोठे नुकसान केल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच हत्तीनेही शिवारात मोर्चा वळविल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग