शहरं
Join us  
Trending Stories
1
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
2
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
3
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
4
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
5
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
6
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
7
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
8
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
9
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
10
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
11
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
12
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
13
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
14
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
15
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
16
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
17
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
18
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
19
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

मतदानादिवशी ६१०० पोलीस, ६०० निमलष्करी दलाची फौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:31 AM

कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदानादिवशी सुमारे ६१०० पोलीस कर्मचारी व होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, ...

कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदानादिवशी सुमारे ६१०० पोलीस कर्मचारी व होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, याव्यतिरिक्त संवेदनशील केंद्रावर राज्य राखीव दल (एसआरपी) आणि केंद्रीय निमलष्करी दल (एसएएफ) ६०० जवान तैनात करण्यात येणार आहेत. हा सर्व बंदोबस्त २१ एप्रिलपासून नियुक्तीच्या ठिकाणी ठेवण्यात येणारआहे.कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस बंदोबस्ताचे वाटप केले; यासाठी जिल्ह्यात ३३२१ मतदान बूथ, तर ५७ तात्पुरते बूथ राहणार आहेत. बूथच्या १८४२ इमारतीमध्ये १९९८ पोलीस कर्मचारी व १३२३ होमगार्ड बंदोबस्तासाठी राहणार आहेत. याशिवाय मतदान इमारतीच्या १०० मीटर परिसरातील बंदोबस्तासाठी ४६२ अतिरिक्तपोलीस आहेत.जिल्ह्यात एक पोलीस अधीक्षक, दोन अप्पर पोलीस अधीक्षक, १० उपअधीक्षक, ४० पोलीस निरीक्षक, १६० पोलीस उपनिरीक्षक, ५३०० पोलीस, १८०० होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत.संवेदनशील ठिकाणी एसआरपी, एसएपी सज्जसंवेदनशील ठिकाणे, पैशांचा वापर होणे, आदी वादग्रस्त ठिकाणे निश्चित केली असून, त्यासाठी एसआयपी (राज्य राखीव दल)च्या तीन तुकड्या व एसएपी (केंद्रीय निमलष्करी दल) च्या तमीळनाडू स्पेशल आर्म फोर्स-१, मध्य प्रदेश स्पेशल आर्म फोर्स-२ तुकड्या मागविल्या आहेत. त्या आज, शनिवारी कोल्हापुरात दाखल होणार आहेत. प्रत्येक तुकडीत १०० कर्मचारी अशी एकूण ६०० जवानांची संख्या आहे.पेट्रोलिंगसाठी १०० अधिकारीमतदानादिवशी जिल्ह्यात पेट्रोलिंगसाठी १०० अधिकारी नियुक्तकेले आहेत. तर २०० पोलीस कर्मचारी व २०० होमगार्ड तैनात आहेत. जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्याच्या अखत्यारित ३१ प्रभारी अधिकारी कार्यरत राहणार असून, ६२ पोलीस व ६२ होमगार्ड नियुक्ती करण्यात आली आहे.पोलीस संख्याजिल्ह्यातील पोलीस : २८००जिल्ह्याबाहेरील पोलीस : १५००होमगार्ड : १८००निमलष्करी दल : ६००मतदानादिवशी वाहने सज्जपोलीस दल : १००भाडेपट्टीवर : १००एस. टी. बसेस : ३०एसआरपी, एसएपीसाठी वाहने : नऊ आरामबस, सहा ट्रक, सहा सुमो.