शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

कोल्हापूर सर्किट बेंचच्या नूतनीकरणाचे दिवस-रात्र काम; तीन कोर्ट रूमची उभारणी, तीन न्यायाधीशांची नियुक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 19:29 IST

न्यायालयाच्या ताब्यात सोमवारी देण्याची तयारी

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचसाठी सीपीआर चौकातील जुन्या न्यायालयाच्या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे युद्धपातळीवर सुरू आहे. दिवस-रात्र राबून हे काम पूर्णत्वास नेले जात आहे. सर्व कामे अंतिम टप्यात आहेत. येत्या सोमवारी ११ ऑगस्टपर्यंत कामे पूर्ण करून न्यायालयाच्या ताब्यात इमारत देण्याचे नियोजन आहे. दरम्यान, शुक्रवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कामाच्या ठिकाणी भेट देवून सर्व कामे वेळेत गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला १८ ऑगस्टला सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होत आहे. सीपीआर समोरील जुन्या न्यायालयाच्या इमारतीमधील सर्किट बेंचसाठी आवश्यक सेवा, सुविधा निर्माण केल्या जात आहेत. अत्याधुनिक असे तीन कोर्ट रूम आणि अँन्टी चेंबर तयार केले जात आहेत. बार रूमही बनवले जात आहे. न्यायाधीश, वकील, पक्षकारांना बसण्यासाठी खुर्च्या आणून ठेवल्या आहेत. वातानुकूलीत यंत्रणा बसवली जात आहे.न्यायालयाच्या ताब्यात इमारत आल्यानंतर कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील मुंबई उच्च न्यायालयातील खटले वर्ग करण्यात येणार आहेत. खटल्याच्या ऑफलाइन आणि ऑनलाइन सुनावणीसाठीची व्यवस्था केली जात आहे. वारंवार वरिष्ठ अधिकारी इमारतीच्या कामांची पाहणी करून आढावा घेत आहेत. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील, ॲड. इंद्रजीत चव्हाण, टी. एस. पाडेकर, के. व्ही. पाटील, मनोज पाटील, संग्राम देसाई, प्रमोद पाटील उपस्थित होते.

तीन न्यायाधीशांची नियुक्ती, १८ ऑगस्टपासून प्रत्यक्ष कामकाज सुरू कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी तीन न्यायाधीशांची शुक्रवारी विशेष नियुक्ती झाली. १७ ऑगस्टला बेंचचे उदघाटन होणार आहे. त्यानंतर १८ ऑगस्टपासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, अजून उद्घाटन कार्यक्रमाचे स्थळ निश्चित झालेले नाही. सर्वाेच्च न्यायालयाच्या प्रोटोकॉलनुसार कार्यक्रमासाठी स्थळ शोधण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.सीपीआर चौकात जुन्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये सर्किट बेंच सुरू होणार आहे. यासाठीच्या सेवा, सुविधा निर्माण करण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. एकाबाजूला इमारतीची डागडुजी, यंत्रणा उभारणी आणि त्याचवेळेला न्यायाधीश, सरकारी वकील, अनुषंगिक कर्मचारी नियुक्तीचा सपाटाही सुरू आहे. एखाद्या कुटुंबात लग्न समारंभ असताना जशी घाई सुरू असते, तशीच घाई सर्किट बेंचच्या तयारीसाठी सुरू आहे. कोल्हापूरच्या सामान्य जनतेतही त्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

कोण असतील न्यायाधीश

  • पुण्यातील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. आर. कचरे (क्रमांक ६)
  • अहमदनगर येथील २४ वे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी आर. एस. धडके.
  • चंद्रपूर जिल्हयातील सावली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. तोंडचिरे.

सरकारी वकीलही झाले फायनलशासनाच्या विधी आणि न्याय विभागाने मुंबई न्यायालयातील अपील शाखेतील अतिरिक्त सरकारी वकील प्रियभूषण काकडे, विकास माळी, संजय रायरीकर, तेजस कापरे, सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वीरा वामन शिंदे, श्रीराम चौधरी, श्रीकांत यादव, आनंद शाळगावकर, नितीन पाटील, पंकज देवकर, अविनाश नाईक, अश्विनी टाकळकर, प्रियांका राणे, शुभांगी देशमुख यांनी पुढील आदेशापर्यंत कोल्हापूर सर्किट बेंच येथील कार्यभार सांभाळावा, असा आदेश उपविधी सल्लागार विलास खांडबहाले यांनी दिला आहे. येत्या आठवड्यात बेंचसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती होणार आहे.