शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत डोक्यात गज घालून मुलीने केला बापाचा खून, मुलगी व आई पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 12:38 IST

वाद इतका टोकाला गेला की, त्यांची मोठी मुलगी साक्षी हिने त्यांच्या टोक्यात लोखंडी गजाने वर्गी घाव घातला

इचलकरंजी : येथील केटकाळे मळ्यात कौटुंबिक वादातून मुलीने वडिलांच्या डोक्यात लोखंडी गज घालून निर्घृण खून केला. शांतीनाथ आण्णाप्पा केटकाळे (वय ४०, रा. बर्गे मळा, इचलकरंजी) असे मृत पित्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. संशयित साक्षी शांतीनाथ केटकाळे (वय २१) व मुलीची आई सुजाता केटकाळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.चंदूर (ता. हातकणंगले) कडे जाणाऱ्या बर्गे मळा परिसरात शांतीनाथ केटकाळे कुटुंबासह राहत असून त्यांना तीन मुली आहेत. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शांतीनाथ केटकाळे यांचा कुटुंबासोबत काही कारणामुळे वाद निर्माण झाला. वाद इतका टोकाला गेला की, त्यांची मोठी मुलगी साक्षी हिने त्यांच्या टोक्यात लोखंडी गजाने वर्गी घाव घातला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूचा चेंदामेंदा झाला होता.यावेळी घरातून मोठा आरडाओरडा ऐकू येत होता. हे ऐकताच भागातील नागरिक घरात गेले.  त्यानंतर तत्काळ केटकाळे यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्यानंतर आयजीएम हॉस्पिटलमध्ये आणले, मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.याची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांनी घटनास्थळी व आयजीएम हॉस्पिटलला भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रात्री उशिरा मुलीच्या आईस पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समजते.या घटनेनंतर पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान करत ताबडतोब संशयित मुलीला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत आयजीएम हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनाचे काम सुरू होते. पोलिसांनी कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत सविस्तर माहिती व स्पष्टता नव्हती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी