भाजप जिल्हा सरचिटणीसपदी दत्तात्रय आवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:23 IST2020-12-22T04:23:00+5:302020-12-22T04:23:00+5:30
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण पातळीवरील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सरचिटणीसपदी दत्तात्रय पांडुरंग आवळे ...

भाजप जिल्हा सरचिटणीसपदी दत्तात्रय आवळे
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण पातळीवरील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सरचिटणीसपदी दत्तात्रय पांडुरंग आवळे शिंगणापूर (ता. करवीर) यांची नियुक्ती करण्यात आली. अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीय आघाडीची जबाबदारी आवळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या हस्ते आवळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
भारतीय जनता पक्षाचा विचार ग्रामीण पातळीवर तळागाळांत रूजावा, यासाठी पक्षाच्या वतीने प्रयत्न सुरू असून ९० कार्यकर्त्यांना जिल्हा, तालुका कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. यावेळी भगवान काटे, विठ्ठल पाटील, दीपक शिरगांवकर यांच्यासह पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
२११२२०२० कोल दत्तात्रय आवळे
भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या हस्ते नूतन सरचिटणीस दत्तात्रय आवळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.