श्री क्षेत्र नृसिंहवाडीचे दत्त मंदिर निम्याहून आधिक पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 09:59 PM2020-08-16T21:59:16+5:302020-08-16T22:01:49+5:30

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत १० फुटाने वाढ झाली आहे.

Datta temple of Shri Kshetra Nrusinhwadi more than half under water | श्री क्षेत्र नृसिंहवाडीचे दत्त मंदिर निम्याहून आधिक पाण्याखाली

श्री क्षेत्र नृसिंहवाडीचे दत्त मंदिर निम्याहून आधिक पाण्याखाली

googlenewsNext
ठळक मुद्देश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत १० फुटाने वाढ दत्त मंदिर निम्याहून आधिक पाण्याखाली

प्रशांत कोडणीकर

नृसिंहवाडी : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत १० फुटाने वाढ झाली आहे.

येथील दत्त मंदिरात निम्याहून आधिक पाण्याखाली गेले असून कोयना व राधानगरी या धरणातून मोठा विसर्ग होत असून शिरोळ तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

गेले काही दिवस कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेने येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात तब्बल १० फुटाने वाढ झाली.पाणी पातळीत वाढ झालेने येथील दत्त मंदिर निम्याहून आधिक पाण्याखाली गेले आहे.

दि.१५ रोजी सकाळी चालू सालातील दूसरा चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला.वाढलेल्या नदीच्या पाणी पातळीने कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमावरील संगमेश्र्वर मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.

मंदिरातनदीचे पाणी असलेने श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी प.प.नारायण स्वामी महाराज यांचे मंदिरात ठेवणेत आली असून तेथे त्रिकाळ पुजा चालू आहे.

दरम्यान कृष्णा नदीचे पाणी पातळीत वाढ होत असलेने येथील दत्त देव संस्थानचे कर्मचारी यांनी मंदिर परिसरातील नदीकाठचे साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे काम सुरु केले आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात चालू असलेला पाऊस व कोयना, राधानगरी या धरणातून मोठा विसर्ग होत असलेने शिरोळ तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.


 

 

Web Title: Datta temple of Shri Kshetra Nrusinhwadi more than half under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.