शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई भक्तांच्या दर्शन रांगा, वाहनतळ जमिनीखालून - पालकमंत्री केसरकर 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: August 28, 2023 15:48 IST

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेल्या कोल्हापूरच्या वैभवाला वर्षभरात नवी झळाळी मिळेल

कोल्हापूर : जिल्ह्याला जागतिक पर्यटनाच्या नकाश्यावर आणण्यासाठी ऐतिहासिक वास्तू, मंदिरे व पर्यटनस्थळांचा विकास केला जात आहे. ही फक्त सुरुवात असून येत्या काळात भूमिगत विद्यूत वाहिन्या तसेच दर्शन रांगा व वाहनतळही जमिनीखालून केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेल्या कोल्हापूरच्या वैभवाला वर्षभरात नवी झळाळी मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली.अंबाबाई भक्तांसाठी भवानी मंडप येथील हुजूर पागा इमारतीतील स्वच्छतागृह व दक्षिण दरवाजासमोर उभारण्यात आलेल्या चप्पल स्टॅन्ड सुविधा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाहू छत्रपती, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी अंबाबाई मंदिर व भवानी मंडप परिसराची पाहणी केली.मंत्री केसरकर म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतून पर्यटनस्थळ विकास कार्यक्रमांतर्गत ८३ लाखांत स्वच्छतागृह व ११ लाख ७८ हजार रुपयांच्या निधीतून चप्पल स्टॅन्ड उभारण्यात आला आहे. मंदिर परिसरातील माहिती केंद्र पागा इमारतीत हलविले जाईल. शाहू महाराजांची सूचना व पुरातत्व विभागाच्या संमतीने कामे केली जात असून पूर्वीचा मंदिर परिसर उभा केला जाणार आहे. कामांची गती संथ असली तरी पुरातत्वचे निकष, गुणवत्ता व तज्ज्ञांचे मार्गदर्शन यात घेतले जात आहे. सर्व कामे चांगली व्हावीत यासाठी आम्ही प्रयत्न करत असून येत्या काळात कोल्हापूरला नवी झळाळी मिळेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरDeepak Kesarkarदीपक केसरकर