दानोळी, कोथळीच्या मोटरसायकल चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:26 IST2021-09-18T04:26:27+5:302021-09-18T04:26:27+5:30
जयसिंगपूर : मोटारसायकली चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश आले. चौघा संशयित आरोपींकडून सात मोटरसायकली असा २ ...

दानोळी, कोथळीच्या मोटरसायकल चोरट्यांना अटक
जयसिंगपूर : मोटारसायकली चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश आले. चौघा संशयित आरोपींकडून सात मोटरसायकली असा २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दानोळी, कोथळी येथील संशयितांचा यामध्ये समावेश आहे.
प्रताप संजय माने, ऋत्विक नितीन इंगवले, वकील संजय वळकुंजे (तिघे रा. दानोळी) व तुषार रावसो तेरदाळे (रा. कोथळी) अशी संशयितांची नावे असून जयसिंगपूर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी (दि. १६) गुन्हे शोध पथक गस्त घालत असताना क्रांती चौक येथे संशयित आरोपी मोटरसायकलवर थांबलेले दिसले. पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच मोटरसायकली चोरल्या असल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली.
फोटो - १७०९२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर पोलिसांनी मोटारसायकल चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला.