शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिर शिखरावर ५ फूट उंचीचे १ हजार टन धोकादायक कोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 18:26 IST

Mahalaxmi Temple Kolhapur , Mahesh Jadhav करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या दगडी बांधकामाच्या छतावरील गळती रोखण्यासाठी अत्यंत धोकादायक पद्धतीने सिमेंटचा ५ फूट थराचा कोबा करण्यात आला आहे, यामुळे शिखरासह छताची बांधणीही धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे अंबाबाई मंदिर शिखरावर धोकादायक कोबा - महेश जाधव स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या दगडी बांधकामाच्या छतावरील गळती रोखण्यासाठी अत्यंत धोकादायक पद्धतीने सिमेंटचा ५ फूट थराचा कोबा करण्यात आला आहे, यामुळे शिखरासह छताची बांधणीही धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये देण्यात आला आहे.

हा कोबा तातडीने काढण्यासाठी देवस्थान समिती प्रयत्न करणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी गुरुवारी सांगितली.अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिरासह समितीच्यावतीने सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, राजू जाधव, राजाराम गरुड, चारुदत्त देसाई उपस्थित होते.

ते म्हणाले, मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम मुंबईच्या स्ट्रकवेल कंपनीकडून केले जात असून, त्यांनी रडार टेस्टिंगनंतर वरील अहवाल दिला आहे. ४०-५० वर्षांपूर्वी त्यावेळच्या लोकांना योग्य वाटेल त्या पद्धतीने त्यांनी मंदिरातील गळती थांबविण्यासाठी प्रयत्न केला असेल.

या दगडी छतावर ५ फूट उंचीचे १ हजार टन कोबा-काँक्रिटीकरण केले आहे. शिवाय झाडांची मुळे मंदिर बांधणीचे नुकसान करत आहेत. ही स्थिती आता धोकादायक वळणावर असून, तातडीने हा कोबा काढणे गरजेचे आहे. हेरिटेज समितीच्या अध्यक्षा अंमरजा निंबाळकर यांनी याबद्दलची तांत्रिक माहिती देत पुरातत्व विभागाकडे याचा प्रस्ताव पाठवून मंजुरी घेऊ, असे सांगितले. 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूरMahesh Jadhavमहेश जाधव