पडसाळीपैकी चव्हाणवाडी येथील धोकादायक डीपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST2021-05-01T04:24:15+5:302021-05-01T04:24:15+5:30

चव्हाणवाडी गावातून तेहतीस के.व्ही.च्या विद्युत वाहिनीचे पोल गेले आहेत. त्याचा मेन डीपी गावात असून त्याच्या सभोवती वस्ती आहे. सदरचा ...

Dangerous DP at Chavanwadi | पडसाळीपैकी चव्हाणवाडी येथील धोकादायक डीपी

पडसाळीपैकी चव्हाणवाडी येथील धोकादायक डीपी

चव्हाणवाडी गावातून तेहतीस के.व्ही.च्या विद्युत वाहिनीचे पोल गेले आहेत. त्याचा मेन डीपी गावात असून त्याच्या सभोवती वस्ती आहे. सदरचा विद्युत डीपीही खराब झालेला असून उघड्यावर आहे. त्याच्याशेजारी गावातील लहान मुले खेळतात. त्यामुळे भविष्यात या डीपीमुळे धोका होण्याची शक्यता आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या डीपीचे गावाबाहेर स्थलांतर करावे, अशी सरपंच पाटील यांनी ग्रामस्थांच्यावतीने मागणी केली आहे.

येथील तेहतीस के.व्ही.च्या विद्युत वाहिनीचे पोल व डीपीचे गावाबाहेर स्थलांतर करावे, अशा मागणीचे ग्रामपंचायतीच्यावतीने स्थानिक ग्रामस्थांच्यावतीने लेखी निवेदन संबंधितांकडे वेळोवेळी दिले आहे. पण संंबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. तेव्हा भविष्यात या डीपीमुळे धोका घडल्यास संंबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असेही सरपंच पाटील यांनी सांगितले.

Web Title: Dangerous DP at Chavanwadi