शिरगावमध्ये माळीण दुर्घटनेसारखा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:40+5:302021-06-18T04:17:40+5:30
लोकमत न्युज नेटवर्क शिरगाव : शिरगाव येथील एसटी स्टॅंडपासून गावात प्रवेश करताना उंच डोंगराच्या दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले असून ...

शिरगावमध्ये माळीण दुर्घटनेसारखा धोका
लोकमत न्युज नेटवर्क
शिरगाव : शिरगाव येथील एसटी स्टॅंडपासून गावात प्रवेश करताना उंच डोंगराच्या दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले असून परिसरात लोकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. परिणामी गावाची अवस्था माळीणच्या दुर्घटनेसारखी होण्याचा धोका आहे.
शिरगाव हे उंच डोंगरावर वसलेले परिसरातील मोठे गाव. गावात प्रवेश करताना मुख्य रस्त्याला लागून उजव्या बाजूला अनेक खासगी मालकीच्या जागेत भरमसाठ खोदाई केल्याने अनेक वेळा दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या लोकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
फोटो : शिरगाव, ता. राधानगरी येथे गावात प्रवेश करताना आज सकाळी मोठी दरड कोसळली. परंतु या दरम्यान कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही.